जपानची वाहन उत्पादक कंपनी Honda ने सोमवारी भारतीय बाजारात आपली अॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली. आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन असलेली या बाईकचा लूक जबरदस्त झाली. कंपनीनं देशभरात आपल्या प्रिमिअम बिग विंग डिलरशीपमध्ये या बाईकची बुकींग सुरू केली आहे.भारतीय बाजारपेठेत ही बाईक कम्पलिट नॉक डाऊन युनिट म्हणून आणण्यात येणार आहे. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये ग्रां प्री रेड आणि मॅट गनपाऊडर ब्लॅक मेटॅलिक कलरचा समावेश आहे. भारतीय बाजार पेठेत ही बाईक प्रामुख्यानं Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Strom 650 या बाईक्सना टक्कर देईल.इंजिन क्षमता आणि किंमतनव्या Honda CB500X मध्ये कंपनीनं 471cc क्षमतेचं 8 वॉल्व्ह लिक्विड कुल्ड पॅरलल ट्विन सिलिंडर इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 47bhp ची पॉवर आणि 43.2Nm चा टॉर्क जनरेट करतं. याशिवाय हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. यामध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच सिस्टमही देण्यात आले आहेत. Honda CB500X या बाईकमध्ये कंपनीनं अनेक प्रिमिअम फीचर्स दिले आहेत, जे या सेगमेंटला जबरदस्त बनवतात. या बाईकमध्ये विंडस्क्रिनसोबत, LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फुल LED लायटिंग, सिंगल पिस सँडल, अलॉय व्हिल्स आणि ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसोबत इमरजन्सी स्टॉप सिग्नलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या बाईकमध्ये सिक्युरिटी सिस्टमही देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 6,87,386 (एक्स शोरुम, गुरुग्राम) इतकी आहे.
Honda CB500X अॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक लाँच; पाहा फीचर्स आणि किती आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:57 PM
कंपनीनं सोमवारी आपली अॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली.
ठळक मुद्देकंपनीनं सोमवारी आपली अॅडव्हेंचर प्रिमिअम बाईक Honda CB500X लाँच केली.कावासाकी, सुझुकीसारख्या जबरदस्त बाईक्सना देणार टक्कर