होंडाकारने (Honda Cars) आपली कार हायब्रिड कार Honda City eHEV च्या किंमतीचा खुलासा केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या कारला भारतीय मार्केटमध्ये लाँच केले होते. या कारची खासियत म्हणजे ही एक पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार तिन्ही प्रकारे चालवली जाऊ शकते.
Honda City eHEV ची सुरूवातीची किंमत कंपनीने 19.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता होंडा कंपनीने ही नवीन कार मार्केटमध्ये आणली आहे. या कारमध्ये इंजिनसह दोन सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये चालवली जाऊ शकते. तसेच, फक्त पेट्रोल मोड किंवा हायब्रिडद्वारे राईड केली जाऊ शकते.
Honda City eHEV कार तुम्ही हायवेवर हाय-स्पीडमध्ये चालवणार असणार तर ही कार पेट्रोल इंजिन मोडवर चालवू शकता. या मोडमध्ये कार क्लचसोबत धावते. तसेच, इलेक्ट्रिक मोटर गरज पडल्यास पीक पॉवर जेनरेट करते. तर हायब्रिड मोडवर तुम्ही ही कारच्या मॅक्सिमम पॉवरचा आनंद घेऊ शकता. या मोडवर गाडी पेट्रोल इंजिन एक इलेक्ट्रिक जेनरेटरसारखे काम करते.
कारमध्ये असलेले हे हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम 126 PS च्या मॅक्स पॉवर आणि 253 Nm च्या पीक टॉर्क जेनरेट करते. यामध्ये चारचाकांवर डिस्क ब्रेकसोबत एक अॅडव्हॉन्स इलेक्ट्रिक सर्वो ब्रेक सिस्टम सुद्धा देण्यात आली आहे. कार चांगली फ्यूल कार्यक्षमता देते आणि यामध्ये असलेले लीथियम आयन बॅटरीला चार्ज करण्यात सुद्धा मदत करते.
होंडा सिटी हायब्रिड 26.5 किमी प्रति लीटरचे मायलेज देते. ही कार भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार मारुती सेलेरिओच्या (Maruti Celerio) बरोबरीचे आहे. सेलेरिओ 26.68 किमी प्रति लीटरचे मायलेज देते.