(Image Credit : www.indiacarnews.com)
नवी दिल्ली : होंडा भारतीय बाजारात आपली नवीन कार CR-V लॉन्च करणार आहे. कंपनीने यावर्षी फेब्रूवारीमध्ये या कारच्या लॉन्चबाबत खुलासा केला होता. त्यावेळी ही कार ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर करण्यात आली होती. आता Honda CR-V ही कार ९ ऑक्टोबरला लॉन्च केली जाणार आहे. पण या कारच्या किंमतीबाबत अजून खुलासा करण्यात आलेला नाहीये.
Honda CR-V या कारचं लेटेस्ट जनरेशन मॉडल जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठं असणार आहे. ही कार दोन इंजिनसोबत बाजारात उतरवली जाणार आहे. Honda CR-V ही कार पहिल्यांदाच भारतात डिझेल इंजिनसोबत लॉन्च केलं जाणार आहे. यात १.६ लीटर यूनिट दिलं जाणार आहे.
या कारमध्ये ट्विन टर्बो दिलं जाणार आहे ज्याची किंमत १.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. सिंगल टर्बो इंजिन १२० हॉर्सपॉवरची क्षमता आणि ३०० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला ९ स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन दिलं जाणार आहे.
यासोबतच Honda CR-V मध्ये २.० लिटर पेट्रोल इंजिन सुद्धा ऑफर केलं जाणार आहे. यात सीवीची दिलं जाणार आहे. २.० लीटरचं इंजिन असलेली ही कार जास्तीत जास्त १५४ हॉर्सपॉवरची ताकद आणि १८९ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. पॉवर आऊटपूट जवळपास ह्युंदई टक्सन एसयूव्ही एवढं आहे. टक्सनमध्ये हेच इंजिन आहे.
नवीन Honda CR-V मध्ये पहिल्यांदाच वेगळ्या सीट्स असणार आहेत. या कारमध्ये ७ सीटरचा पर्याय ऑफर केला जाणार आहे. Honda CR-V मध्ये पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ड्यूअल जोन कंट्रोल आणि ७.० ची टचस्क्रीन आहे जे अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्रॉईड सीटला सपोर्ट करतं. Honda CR-V या कारची अधिकृत किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी ही कारची किंमत २८ लाख असू शकते असा अंदाज आहे.