जपानच्या ऑटोमोबाइल कंपनी होंडानं आपल्या लोकप्रिय एसयूव्ही CR-V च्या नव्या मॉडलचा लूक अखेर समोर आणला आहे. ही एसयूव्ही कार पहिल्या व्हर्जनच्या तुलनेत आकारानं मोठी आणि नव्या डिझाइनसह बाजारात लॉन्च होणार आहे. होंडानं CR-V च्या इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये काही बदल केले आहेत. नव्या कारमध्ये हायब्रिड पावरप्लांट देखील अपग्रेड केला आहे.
होंडानं CR-V चं फिफ्थ जनरेशन मॉडल २०१६ मध्ये लॉन्च केलं होतं आणि २०१९ मध्ये यात काही बदल देखील केले होते. CR-V च्या नव्या मॉडलमध्ये नवं केबिन, मोठं बोनट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्समेंट स्क्रीनसारखे जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत.
होंडा CR-V मध्ये काय-काय बदललं?होंडा CR-V च्या जुन्या मॉडलच्या तुलनेत नव्या मॉडलमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आले आहेत. या कारच्या चाहत्यांना नव्या मॉडलमध्ये आकारानं जरा मोठी कार पाहायला मिळेल. कारण याआधीच्या व्हर्जनच्या तुलनेत ही कार 69mm लांब, 10mm रुंद असणार आहे. तसंच व्हीलबेससुद्धा 10mm नं वाढविण्यात आला आहे.
अपडेटेड पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनहोंडा सीआर-व्हीमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि २.० लीटर हायब्रिड युनिटचं अपडेटेड व्हर्जन मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होंडा नवी एसयूव्हीच्या बेस मॉडलमध्ये १.५ लीटर इंजिनसोबतही सादर करू शकते. तर अपडेटेड व्हर्जनमध्ये हायब्रिड इंजिन पाहायला मिळू शकतं. काही कालावधीनंतर बाजारात याचं डिझेल व्हर्जन देखील लॉन्च होईल.
नव्या CR-V चे फिचर्सआगामी होंडा सीआर-व्हीचं केबिन ११ जेन होंडा सिविकसारखं पाहायला मिळतं. नव्या सीआर-व्हीमध्ये तुम्हाला ७ इंचाचा संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि ७ किंवा ९ इंचाच्या पर्यायासह इन्फोटेनमेंट स्क्रीनसारखे शानदार फिचर्स मिळणार आहेत. होंडानं नव्या एअर कंडीशनिंगच्या कंट्रोलसाठी नवे फिजिकल नॉब आणि बटण देण्यात आलं आहे. दरम्यान ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत नेमकी केव्हा लॉन्च होणार याची माहिती समोर आलेली नाही.