नवी दिल्ली : लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया देशात आपला व्यवसाय वाढवत आहे. कंपनीने नुकतीच 100 सीसी इंजिन असलेली होंडा शाईन (Honda Shine) ही सर्वाधिक विक्री होणारी बाइक सादर केली आहे. याआधी होंडाने Activa 125 आणि H-Smart व्हेरिएंट लाँच केले होते. आता कंपनीने होंडा डिओलाही ( Honda Dio) ही ट्रीटमेंट दिली आहे.
कंपनीने अधिकृत वेबसाइटवर Honda Dio H-Smart सादर केली आहे. Honda Dio ची हा किंवा नवीन टॉप-एंड व्हेरिएंट 77,712 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत सादर करण्यात आला आहे. याशिवाय होंडाने सध्याच्या डिओ व्हेरिएंटच्या किमतीही वाढवल्या आहेत. आता STD OBD2 ट्रिमसाठी स्कूटरची किंमत 70,211 रुपये आहे, तर DLX OBD2 व्हेरिएंटची किंमत 74,212 रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत.
नवीन Honda Dio H-Smart कोणत्या फीचर्ससह येणार आहे, याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, ते Activa H-Smart प्रमाणेच इक्विपमेंट स्तरावर येणे अपेक्षित आहे. त्यानुसार, Honda Dio H-Smart चा हा नवीन व्हेरिएंट अलॉय व्हील, इंधन कार्यक्षम टायर आणि स्मार्ट कीसह सादर केला जाऊ शकतो. आतापर्यंत डिओच्या सर्व व्हेरिएंटमध्ये ट्यूबलेस टायर्ससह स्टीलची व्हील आहेत.
कंपनीने H-Smart key मध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स ऑफर केले आहेत. यामध्ये अँटी-थेफ्ट सिस्टम देखील मिळते, जी की जेव्हा 2-मीटरच्या पलीकडे हलवली जाते. तेव्हा इमोबिलायझर सक्षम करते. दुसरीकडे, स्मार्ट की रेंजमध्ये असल्यास, तिचे हँडल, इंधन कॅप आणि सीट अनलॉक करता येते. इग्निशन चालू करण्यासाठी, राइडरला फक्त रेंजमध्ये राहून रोटरी नॉबला धक्का द्यावा लागतो आणि फिरवावा लागतो. इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच देखील पुशने सुरू केले जाऊ शकते.
Dio H-Smart मध्ये 109.51 cc एअर-कूल्ड इंजिन असणार आहे. जे Activa सोबत शेअर करते. तसेच हे 8,000 rpm वर 7.65 bhp पॉवर आणि 4,750 rpm वर 9 Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. याशिवाय, सस्पेंशन आणि ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये कोणताही बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. याच्या अंडर बोन फ्रेमला फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये 3-स्टेप अॅडजस्टेबल स्प्रिंग-लोडेड हायड्रोलिक शॉक अॅब्जॉर्बरद्वारे सस्पेंड केली जाईल. याच्या फ्रंट आणि रिअरमध्ये 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.