शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Honda Activa 125 खरेदी करण्याची उत्तम संधी, कंपनीकडून स्कूटरवर शानदार ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 5:01 PM

Honda Activa 125 Scooter : या ऑफरचा लाभ ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर मिळेल.

नवी दिल्ली : होंडाची अ‍ॅक्टिव्हा 125 स्कूटर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीने (Honda Motorcycle and Scooter India) अ‍ॅक्टिव्हा 125 (Activa 125) स्कूटरवर विशेष कॅशबॅक ऑफर दिली आहे. होंडाने जाहीर केलेल्या या ऑफरमध्ये ग्राहकांना या स्कूटरच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. दरम्यान, या ऑफरचा लाभ ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर मिळेल. कंपनी किमान 30,000 रुपयांच्या व्यवहारांवर 5 टक्के म्हणजेच 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देईल.

'ही' ऑफर 31 मार्च 2022 पर्यंतयाशिवाय,  होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया ग्राहकांच्या आवडत्या Activa 125 स्कूटरची ऑफर देत आहे, या स्कूटरचे सुरूवातीचे डाउन पेमेंट 3,999 रुपये आहे. तसेच, कंपनीने ही ऑफर केवळ 31 मार्च 2022 पर्यंत ग्राहकांना दिली आहे. या ऑफर डीलरशिप आणि शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम डीलसाठी त्यांच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधण्याची शिफारस करतो. Activa 125 व्यतिरिक्त कंपनीने Activa 6G वर देखील ही ऑफर उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर दरम्यान, Activa 125 ला भारतीय ग्राहकांना कितपत पसंती मिळते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ही स्कूटर बऱ्याच दिवसांपासून कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. अगदी होंडा टू-व्हीलरनेही या स्कूटरच्या 1,43,234 युनिट्सची भारतात गेल्या महिन्यात विक्री केली आहे. Activa 125 मध्ये 124 सीसीचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 6500  आरपीएमवर 8.18 बीएचपी पॉवर आणि 5000 आरपीएमवर 10.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारपेठेत  Activa 125 ची टक्कर  Suzuki Access 125 आणि TVS Jupiter 125 शी आहे.

टॅग्स :Hondaहोंडाscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन