हिरो मोटोकॉर्पची (Hero MotoCorp) हिरो स्प्लेंडर प्लस ( Hero Splendor Plus) बाईक गेल्या अनेक वर्षांपासून 100 सीसी कम्युटर मोटरसायकल सेगमेंटवर राज्य करत आहे. पण आता Hero's Splendor शी टक्कर देण्यासाठी होंडाने (Honda) आपली नवीन बाईक Honda Shine 100 ही 100 सीसी सेगमेंटमध्ये मार्चमध्ये लाँच केली आहे. आता या बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.
होंडाने ही बाईक ग्राहकांसाठी मार्चमध्ये बाजारात लाँच केली होती. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपये आहे. लाँच झाल्यानंतर या बाईकचे बुकिंग सुरू करण्यात आले. आता rush lane च्या अहवालावरून माहिती समोर आली आहे की, होंडाच्या 100 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या बाईकची डिलिव्हरी मे 2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
हिरोची स्प्लेंडर बाईक आपल्या चांगल्या मायलेज आणि परफॉर्मेंसमुळे ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता होंडीची ही बाईक देखील अपेक्षित ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी चांगला परफॉर्म करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत समोर आलेले टीझर्स असे संकेत देतात की Honda Shine 100 चे फोकस एरिया चांगले मायलेज देणारे आहे. ही बाईक स्प्लेंडर प्लस प्रमाणेच 65kmpl मायलेज देऊ शकते.
फीचर्सया होंडा बाईकमध्ये तुम्हाला एक बेसिक अॅनालॉग डॅश मिळेल, जो वॉर्निंग लाइट्स व्यतिरिक्त स्पीडोमीटर आणि फ्युएल गॉज सारखी फीचर्स दाखवेल. तसेच, 100 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या बाईकमध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मोठी सीट आणि कॉम्बी-ब्रेक सिस्टीम मिळेल.
'या' बाईकसोबत Honda Shine ची स्पर्धा100 सीसी सेगमेंटमध्ये केवळ Hero Splendor नाही तर Bajaj ची Platina आधीच ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, अशा परिस्थितीत ही होंडा बाईक हीरो आणि बजाज या दोन्ही मॉडेल्सना बाजारात टक्कर देऊ शकते.