शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Honda H'ness CB: होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 8:04 PM

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुढील महिन्यात नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. ही प्रीमियम दर्जाची मोटरसायकल असेल.

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुढील महिन्यात नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. ही प्रीमियम दर्जाची मोटरसायकल असेल. ही बाईक 8 ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. ही एक मिडलवेट बाईक असेल आणि नवीन मोटरसायकल होंडाच्या बिग विंग प्रीमियम चेन डीलरशिपद्वारे विकली जाईल. सध्या कंपनीने या उत्पादनाविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही, परंतु कंपनीने 8 ऑगस्ट रोजी लॉन्च सोहळ्याचं निमंत्रण शेअर केलं आहे.

ही मध्यम क्षमतेची सेगमेंट बाइक असू शकते. यामध्ये 500 सीसीचे इंजिन दिसू शकते. सेगमेंट क्रूझर सेगमेंटमधील ही H'ness 350 सीरिजची मोटरसायकल असू शकते. अलीकडेच Honda CRF 300L भारतात दिसली आहे. पण आतापर्यंत कंपनीने अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. 

ही असेल होंडाची ऑफ रोड बाईकइंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, Honda आता ऑफ-रोड बाइक्स लाँच करण्याचा विचार करत आहे. ज्यांना CRF 300L आणि CRF 500L असे नाव दिले जाऊ शकते. या मोटारसायकली केटीएम अॅडव्हेंचर सीरिजशी स्पर्धा करतील.

होंडाच्या आगामी बाइकमध्ये 286 सीसी इंजिन?वेबसाइट जिगव्हील्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की 8 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार्‍या मोटरसायकलचे नाव CRF 300L असू शकते. या मोटरसायकलच्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 286 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 27.33 PS पॉवर आणि 26.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. पण या आगामी मोटरसायकलबद्दल बरेच तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Honda ने आपली Honda CBR 150R Repsol मलेशियामध्ये सादर केली आहे. ही मोटारसायकल नुकतीच मलेशियामध्ये सादर करण्यात आली असून लवकरच ती इतर देशांमध्येही सादर केली जाईल. कंपनीने ही मोटरसायकल ऑरेंज कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन