वाहन निर्माता कंपनी होंडाकार्स इंडिया (Honda Cars India) 2030 पर्यंत देशात तब्बल पाच स्पोर्ट्स यूटिलिटी वाहन (SUV) सादर करण्याच्या तयारीत आहे. होंडाकार्स इंडियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ताकुया त्सुमुरा यासंदर्भात बोलताना म्हणाले. ‘‘आता आमचा फोकस एसयूव्ही सेगमेंटवर आहे. एलिव्हेटपासून सुरुवात करत आम्ही 2030 पर्यंत 5 एसयूव्ही बाजारात आणणार आहोत. कंपनीसाठी एसयूव्ही सेगमेंटमध्ये राहणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या विक्रीच्या बाबतीत टॉपरव आहेत."
लॉन्च केली एलिव्हेट एसयूव्ही -होंडाने म्हटले आहे, एलिव्हेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही 10.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे. या कारची प्राईस रेन्ज 15.99 लाख रुपये (टॉप मॉडल) पर्यंत जाते. हिची सुरुवातीची किंमत क्रेटाच्या तुलनेत (10.87 ते 19.20 लाख रुपये) अधिक तर टॉप व्हेरिअंटची किंमत त्याहून कमी आहे. बाजारात हिचासामना केवळ क्रेटासोबतच नाही, तर किआ सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, फॉक्सवॅगन ताइगुन आणि स्कोडा कुशाक सारख्या एसयूव्हीसोबतही असणार आहे.
होंडा एलिव्हेटचं इंजिन - होंडा एलिव्हेट ही एसव्ही, व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या चार ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यात 1.5L, 4-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड i-VTEC पेट्रोल इंजिन मिळेल. जे 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. या कारला 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शनही देण्यात आले आहे.
होंडा एलिव्हेटाची किंमत -SV MT व्हेरिअंट- 10,99,900 रुपयेV MT व्हेरिअंट- 12,10,900 रुपयेV CVT व्हेरिअंट- 13,20,900 रुपयेVX MT व्हेरिअंट- 13,49,900 रुपयेVX CVT व्हेरिअंट- 14,59,900 रुपयेZX MT व्हेरिअंट- 14,89,900 रुपये ZX CVT व्हेरिअंट- 15,99,900 रुपये
या एसयूव्हीमध्ये 8-इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, 6-स्पिकर साउंड सिस्टिम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर फॉग लॅम्प, सिंगल-पेन सनरूफ, 17-इंच डुअल-टोन अलॉय व्हील, रिव्हर्सिंग कॅमेरा, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स, ऑटोमॅटिक एसी, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, 7-इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग आणि ADAS मिळते.