शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Honda नवी कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार, टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाला टक्कर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 5:45 PM

जपानी वाहन निर्माता कंपनी Honda पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे.

जपानी वाहन निर्माता कंपनी Honda पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी, कंपनीने Honda Jazz, Honda WR-V आणि Honda City फोर्थ जनरेशनचे उत्पादन बंद केल्याचेही वृत्त आहे. Honda ने आधीच Honda Civic आणि Honda CRV बंद केलं आहे. अशा परिस्थितीत, नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही होंडाची लाइनअप मजबूत करण्यासाठी काम करेल. भारतीय बाजारपेठेत चार मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. लॉन्च झाल्यानंतर होंडाच्या आगामी एसयूव्हीची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, निसान मॅग्नाइट या एसयूव्हीशी असणार आहे. कंपनी Honda Amaze sedan च्या प्लॅटफॉर्मवर नवीन SUV तयार करू शकते.

असं असेल SUV चं नवं डिझाइनहोंडा कंपनी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही राजस्थानमधील तपुकारा प्लांटमध्ये तयार करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी एसयूव्हीचे डिझाइन होंडाच्या एसयूव्ही BR-V वरून प्रेरित असू शकते. दुसरीकडे, विद्यमान प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे होंडा देखील भारतात बनवलेल्या कार विदेशात निर्यात करू शकते. बंद झालेल्या W-RV च्या जागी आगामी SUV बाजारात आणली जाईल.

आगामी SUV चे स्पेसिफिकेशन्सरिपोर्ट्सनुसार, आगामी एसयूव्ही होंडा अमेझच्या आर्किटेक्चरवर विकसित केली जाऊ शकते. त्याच वेळी, नव्या SUV चे पॉवरट्रेन पर्याय देखील Honda Amaze सारखेच असण्याची अपेक्षा आहे. Honda Amaze sedan ला 1.2-liter i-VTEC चार-सिलेंडर पेट्रोल आणि 1.5-लीटर i-DTEC चार-सिलेंडर डिझेल इंजिनमधून पॉवर मिळते. दोन्ही इंजिन चांगले मायलेज देण्यासाठी ओळखले जातात.

नवीन मध्यम आकाराची एसयूव्हीHonda Amaze सारख्या पॉवरट्रेन व्यतिरिक्त, नवीन SUV मध्ये हायब्रिड तंत्रज्ञान देखील मिळू शकते, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल. त्याच वेळी, होंडाच्या नवीन कारला देखील CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी SUV मध्ये सर्व नवीनतम कनेक्टिव्हिटी, सुरक्षा, मनोरंजन आणि उपयुक्तता आधारित वैशिष्ट्ये मिळतील. गाडीवाडीच्या मते, होंडा नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर देखील काम करत आहे.

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग