होंडाने ईलेक्ट्रीक कार बाजारात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. याद्वारे जगभरातील ईलेक्ट्रीक कार कंपन्यांना टक्कर देण्यात येणार आहे. जपानी कंपनीने लास वेगासला ९ जानेवारीपासून आयोजित केल्या जाणाऱ्या सीईएस २०२४ मध्ये भारतात उतरविलेल्या कारची ईलेक्ट्रीक आवृत्ती शोकेस करण्याची तयारी सुरु केली आहे. या वाहनांपैकी एका कारचा फोटो टीज केला आहे.
होंडाने नुकत्याच ईलेक्ट्रीक एसयुव्हीचे अनावरण केले आहे. ही कार पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने आणखी दोन इलेक्ट्रीक कारची कॉन्सेप्टदेखील दाखविली आहे. या कारना सस्टेना सी आणि सीआय एमईव्ही सेल्फ ड्रायव्हिंग मायक्रो मोबिलिटी म्हटले जात आहे. ईव्ही कारचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी असेल असे फोटोंमधून दिसत आहे. या कार स्पोर्टी डिझाईनच्या असणार आहेत.
होंडाने ईव्हींच्या मॉडेल्सबद्दल जास्त माहिती दिलेली नाहीय. परंतु, २०४० पर्यंत कंपनी फक्त ईव्ही विकणार आहे. म्हणजेच पेट्रोल, डिझेलवरील कार पूर्ण बंद करणार आहे. भारतात २०२६ पर्यंत एलिवेट कॉम्पॅक्ट एसयुव्हीची ईलेक्ट्रीक कार आणण्याची योजना कंपनी बनवत आहे.
पुढील सहा वर्षांत भारतात होंडा सहा कार लाँच करणार आहे. यामध्ये होंडा एलिवेट ईव्ही देखीलअसणार आहे, असे संकेत भारतातील कंपनीचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले आहे.