नवी दिल्ली : Honda Motorcycle and Scooter India ने भारतीय बाजारात 2018 Honda CB Hornet 160R ही बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. याआधी 2018 Honda CB Hornet 160R ही बाईक ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर करण्यात आली होती.
2018 Honda CB Hornet 160R बाईकमध्ये स्टायलिंग अपडेट केले गेले आहेत. सोबतच या बाईकमध्ये आता सिंगल चॅनेल एबीएस देण्यात आलंय. पण हे एक पर्यायी फीचर आहे. त्यासोबतच या बाईकमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प आणि नवीन ग्राफिक्स लावण्यात आले आहेत.
काय आहेत फीचर्स?
2018 Honda CB Hornet 160R मध्ये १६२. ७ सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन १४. ९ बीएचपीची पॉवर आणि १४.५ एनएमचा टॉर्क जेनरेट करतं. या इंजिनला ५ स्पीड गिअरबॉक्स लावण्यात आलाय. बाईकमध्ये फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलंय. बाईकच्या टॉप व्हेरिएंटमध्ये डिस्क आणि बेस व्हेरिएंटमध्ये ड्रम ब्रेक लावण्यात आले आहेत.
कुणासोबत असेल स्पर्धा?
2018 Honda CB Hornet 160R या बाईकची स्पर्धा Yamaha FZ-S-FI, Bajaj Pulsar NS 160 आणि TVS Apache RTR 160 4V या बाईक्ससोबत असणार आहे. तर बाईकची विक्री पुढील महिन्यात सुरु होणार आहे. बुकींगही पुढील महिन्यातच होणार आहे.
किती असेल किंमत?
बाईकच्या सीबीएस ट्रिमची दिल्ली एक्स शोरूम किंमत ८४,६७५ रुपये ठेवण्यात आलीय. तर बाईकच्या टॉप एन्ड एबीएस व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत ९२, ६७५ रुपये ठेवण्यात आलीये.
कोणत्या व्हॅरिएंटची किती किंमत?
स्टॅंडर्ड - ८४, ६७५ रुपये सीबीएस - ८९, १७५ रुपये एबीएस - ९०, १७५ रुपये एबीएस डिलक्स - ९२, ६७५ रुपये