शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:21 IST

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे.

सध्या होंडा कार भारतीय बाजारात एका मोठ्या यशाच्या शोधात आहे. कार विक्रीच्या बाबतीत कंपनीला फारशी चांगली ग्रोथ मिळालेली नाही. महत्वाचे म्हणजे होंडाच्या CR-V आणि Civic सारख्या गाड्यांनाही फारशी कमाल दाखवता आलेली नाही. कंपनीची मदार सध्या सिटी आणि अमेझ सारख्या सेडान कारवरच टिकून आहे. एप्रिल 2023 मध्ये लागू होणाऱ्या RDE (रियल ड्रायव्हिंग एमिशन) नियमांच्या पारश्वभूमीवर Jazz, WR-V आणि चौथ्या जेनरेशनची City सारख्या कारही बंद होतील. यानंतर कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये  केवळ दोनच कार शिल्लक राहतील. 

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. सध्या ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस या सेगमेंटमधील बेस्ट-सेलिंग कार आहेत. होंडा याच सेग्मेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. अद्याप पर्यंत Honda ची नवी कॉम्पॅक्ट SUV भारतात एकदाही टेस्टिंग दरम्यान दिसून आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, कंपनीने भारताबाहेरच कारची टेस्टिंग सुरू केली अल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फीचर्स आणि किंमत -होंडाची ही एसयूव्ही दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह भारतीय बाजारात उतरवली जाऊ शकते. पहिले म्हणजे, 1.5L iVTEC पेट्रोल इंजिन, जे Hona City तही मिळते. दुसरे म्हणजे, 1.5 लीटर स्ट्रॉन्ग हायब्रिड युनिट, जे City e:HEV मध्ये येते. जर होंडा एसयूव्हीला हायब्रिड पर्याय मिळाला, तर ही थेट ग्रँड व्हिटारा आणि टोयोटा हायरायडरला टक्कर देईल. कंपनी यात ADAS चे फीचरही देत आहे.

याशिवाय, या कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मेमरी फंक्शनसह ऑटोमॅटिक सीट्स मिळू शकतात.  ही कारची लांबी 4,300mm असेल. तर हिची सुरुवातीची किंमत 10-11 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझAutomobileवाहन