पेट्रोल आणि डिझलच्या वाढत्या किंमती आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे. चार्जिंग स्टेशन्सचा अभाव हे एक कारण अनेकांना इलेट्रिक कार विकत घेण्यापासून रोखत आहे. तेलावर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणे या गाड्या रिफ्युल करण्यासाठी वेळ देखील जास्त लागतो. परंतु आता ही समस्या सोडवण्यासाठी होपचार्ज (Hopcharge) नावाच्या कंपनीने ऑन-डिमांड डोर टू डोर ईव्ही चार्जिंग सोल्युशन सादर केले आहे.
होपचार्जने कमीत कमी 36 मिनिटांत इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्ज करण्याचा दावा केला आहे. साहजिक आहे हा चार्जिंग टाइम प्रत्येक व्हेईकलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. परंतु या सर्विसमुळे अनेक इलेक्ट्रिक कार मालकांची गैरसोय कमी होईल. होपचार्जच्या मदतीने इलेक्ट्रिक कार मालक कधीही आणि कुठेही आपली कार चार्ज करू शकतात. कारण ही एक ऑन डिमांड ईव्ही चार्जिंग सर्व्हिस आहे.
किंमत आणि उपलब्धता
होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सेवा कंपनीच्या अँड्रॉइड किंवा आयओएस ऍपवरून बुक करता येईल. बुकिंग झाल्यानंतर कमीत कमी वेळात एक कस्टम हार्डवेयर, बॅटरी Hopcharge e-Pod ग्राहकांपर्यंत येईल. ही एक CNG वॅन आहे, जी बॅटरीसह कमीत कमी वेळात ईव्ही चार्ज करण्यासाठी बनवण्यात आली आहे. या सर्व्हिसची किंमत पेट्रोल आणि स्लो चार्जिंग सर्व्हिस यांच्या दरम्यान ठेवण्यात येईल. ही सेवा पेट्रोलपेक्षा 50-60 टक्के कमी आणि स्लो चार्जिंग सर्व्हिसपेक्षा 20-30 टक्के जास्त किंमतीत उपलब्ध होऊ शकते, असे होपचार्जचे संस्थापक अर्जुन सिंह यांनी सांगितले आहे.