BMW G310R ही स्वस्तातली बाईक पुन्हा एकदा चर्चेत आली असून पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल पाहून ग्राहकाचे डोळे पांढरे झाले आहेत. बीएमडब्ल्यूने कमी किंमतीत G310R ही धाकड बाईक भारतातील सामान्य ग्राहकांसाठी लाँच केली खरी मात्र या बाईकच्या पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल पाहिल्यावर बाईकची जादाची किंमत वसूल करत असल्याचे दिसत आहे.
G310R ही 300 सीसी बाईक एका ग्राहकाने नुकतीच 2100 किमीनंतर पहिल्या सर्व्हिसिंगला दिली होती. मात्र जेव्हा तो बाईक आणायला सर्व्हिस सेंटरमध्ये गेला तेव्हा बिल पाहून हादरलाच. एखाद्या प्रिमिअम कारच्या पहिल्या सर्व्हिसिंगएवढे 9,257 रुपयाचे बिल त्याच्या हातावर ठेवण्यात आले.
अशा प्रकराची लूट बीएमडब्ल्यूच्या डिलरकडून अन्य ग्राहकांचीही होत आहे. कंपनी मोठी असली तरीही 300 सीसीसाठी इतर कंपन्यांच्या तुलनेत 1 लाख रुपयांनी या बाईकची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी 6999 रुपयांच्या इएमआयमध्ये G310R ही बाईक विकत आहे.