जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन व्हेईकल्स लाँच करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक कंपनीने आपली पहिली मॅक्सी इलेक्ट्रीक स्कूटर EICMA ऑटो शोमध्ये सादर केली आहे. कंपनीने या स्कूटरला Senmenti 0 असे नाव दिले आहे. हॉर्विनचा दावा आहे की ही स्कूटर रायडर्ससाठी खूप खास ठरेल. तसेच, त्याचे डिझाइन पॉवरट्रेन आणि स्पेसिफिकेशन इतर स्कूटरपेक्षा वेगळे असेल.
हॉर्विन ही ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक कंपनी आहे. त्याने 2019 मध्ये पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली. त्याला CR6 Pro असे नाव देण्यात आले होते. दुसरीकडे, हॉर्विनची पहिली मॅक्सी इलेक्ट्रीक स्कूटर ही Senmenti 0 400 V आर्किटेक्चरवर आधारित स्कूटर आहे. यामध्ये 0 ते 80 टक्के चार्जिंग अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होईल. त्याचबरोबर वेगाच्या बाबतीत ही इतर स्कूटर्सपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग केवळ 2.5 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे. तसेच, ते सरासरी 80 किमी प्रतितास वेगाने जास्तीत जास्त अंतर कापेल. या स्कूटरचा टॉप स्पीड 200 किमी प्रति तास आहे. त्याचवेळी, कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर एका चार्जमध्ये 300 किलोमीटरचे अंतर कापू शकेल.
हे फीचर्स मिळणारSenmenti 0 मध्ये 30 सेन्सर्स आणि कॅमेरे देण्यात आले आहेत, जे रिअल टाइम इन्फॉर्मेशन प्रदान करतील. यात एबीएस, अँटी स्लिप सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग, कोलिजन अलर्ट देखील आहे. ही सर्व वैशिष्ट्ये रायडर्सचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगला करतील. तसेच त्यांची सेफ्टी लेव्हलही वाढवतील. याशिवाय या स्कूटरमध्ये हिल क्लाइंब असिस्ट, स्टार्ट आणि रिव्हर्स असिस्टंट, हीटेग ग्रिप्स आणि कीलेस गो सारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने या स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड दिले आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल, हीटेड सीट्स, टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि अॅडजस्टेबल विंडस्क्रीन देखील देण्यात आलेले आहेत.
… तरी परफॉर्मन्स तसाच राहिलहॉर्विनच्या मते, बॅटरी कमी असली तरी या स्कूटरच्या कामगिरीवर फारसा परिणाम होणार नाही. यात रेंज एक्स्टेन्डर फीचर देखील उपलब्ध आहे, जे अशा परिस्थितीत रायडरला जास्त अंतर कापण्यास मदत करेल. या फंक्शनचा वापर करून स्कूटरची रेंज किती वाढवली जाऊ शकेल याबद्दल अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार बॅटरी पॅकचा वापर पॉवर सोर्स म्हणून करता येऊ शकतो.