गाडी पार्किंग करणे ही एक अशी समस्या बनली आहे जी छोट्या मोठ्या शहरामध्ये डोकेदुखी ठरत आहे. सोशल मिडियावर सध्या कार पार्किंगचा एक अनोखा जुगाड व्हायरल होत आहे. एका सरदाराने त्याची कार उचलून ठेवता येऊ शकेल अशा जागेत आरामात पार्क केली आहे. या व्हिडीओला महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनीही लाईक, शेअर केले आहे.
देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर कमालीचे अॅक्टीव्ह असतात. महिंद्रा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडत असतात. खासकरून ते युनिक आयडिया असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्यास ते चुकत नाहीत. सोशल मिडीयावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टनाही लोकांची पसंती मिळते.
आनंद महिंद्रा यांनी कार पार्किंगचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक सरदार त्याची गाडी कमी जागा असलेल्या ठिकाणी पार्क करत आहे. ही अशी जागा आहे जिथे कार उचलून ठेवावी लागेल. केवळ कारच्य़ा आकाराची ही जागा भिंतीला चिकटून आहे. कार मागे, पुढे घेण्याची कोणतीही संधी याठिकाणी नाही.
या सरदाराने आयडियाची कल्पना वापरून पार्किंगसाठी कारखाली सरकते स्टँड बनविले आहे. ते बाहेर काढून त्यावर कार चढवावी लागते. हे इतके अलगद आहे की नुसता पाय जरी लावला तरीही ते सरकते. कार चढविल्य़ानंतर पुन्हा थोड्या ताकदीने ढकलल्यावर कार त्या जागेत पार्क होते.