जनतेसोबत पोलिस कसे वागतात? कैद करण्यासाठी खांद्यावर कॅमेरे लावा : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 03:20 PM2019-07-03T15:20:21+5:302019-07-03T15:20:54+5:30

दिल्लीमध्ये नुकतीच एक घटना घडली होती. एक टेम्पोचालक पोलिसांवर तलवार घेऊन धावला होता.

How does police deal with the people? Put cameras on the shoulders to capture: High Court | जनतेसोबत पोलिस कसे वागतात? कैद करण्यासाठी खांद्यावर कॅमेरे लावा : उच्च न्यायालय

जनतेसोबत पोलिस कसे वागतात? कैद करण्यासाठी खांद्यावर कॅमेरे लावा : उच्च न्यायालय

Next

दिल्लीउच्च न्यायालयाने सोमवारी एका याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना दिशानिर्देशन करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून पोलिसांचे नागरिकांशी होणाऱे वर्तन सुधारेल आणि पारदर्शकता येईल. यासाठी पोलिसांच्या खांद्यावर बॉडी कॅमेरा लावण्याचे उच्च न्यायालयाने सुचविले आहे. 


दिल्लीमध्ये नुकतीच एक घटना घडली होती. एक टेम्पोचालक पोलिसांवर तलवार घेऊन धावला होता. यानंतर त्या ठिकाणी पोलिस आणि गटामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर टेम्पोचालक आणि त्याच्या मुलाला मारहाण करण्यासाठी पोलिसांवर आरोपही झाले होते. या प्रकारावरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश डी एन पटेल आणि सी हरिशंकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यांनी गृह मंत्रालय, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अमित साहनी यांच्या प्रस्तावावर विचार करायला सांगितले आहे. तसेच न्यायालयाने आपण कोणत्याही प्रकारचे निर्देश देत नसल्याचेही यावेळी सांगितले. 


अनेकदा कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी जमावाला नियंत्रित करताना लोक पोलिसांसी हुज्जत घालतात. रस्त्यावर वाहन चालविताना किंवा तपासणीसाठी थांबविल्यासही लोक हुज्जत घालतात. तर अनेकदा पोलिसही उगाचच लोकांना नाडतात, असे आरोप झालेले आहेत. यामुळे बॉडी कॅमेरा लावल्यास त्यामध्ये सर्वकाही रेकॉर्ड होते. याचा वापर पुरावे गोळा करण्यासाठी होऊ शकतो. 


काय आहे बॉडी वॉर्न कॅमेरा
बॉडी वॉर्न कॅमेरा हा पोलिसांच्या खांद्याला किंवा डोक्यावर लावता येतो. या कॅमेरामध्ये त्यांच्या आवाजासह घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड होतो. जर कॅमेरातील डेटा डिलीट केला नसेल तर सुरक्षित ठेवता येतो. 

Web Title: How does police deal with the people? Put cameras on the shoulders to capture: High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.