इलेक्ट्रीक वाहनांच्या (Electric Vehicles) दुनियेत उद्याच्या स्वातंत्र्य दिनी दोन कंपन्या पाऊल ठेवणार आहेत. ओला (Ola) आणि सिंपल एनर्जी (Simple one) या कंपन्या आपल्या ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहेत. पैकी ओलाची स्कूटर हायटेक, तर सिंपलची स्कूटर लंबी रेस का घोडा ठरणार आहे. ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची बहुतांशी वैशिष्ट्ये समोर आली आहेत. रिव्हर्स गिअर, 10 रंग, घरी डिलिव्हरी, घरीच सर्व्हिसिंग आदी फिचर सीईओ भाविश अग्रवाल यांनीच उघड केली आहेत. आता ओलाच्या या स्कूटरची किंमत किती असेल, याबाबतच अग्रवाल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (What is Ola Scooter price? Bhavish Agarwal has gone viral before launch)
Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा...
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...Ola Electric scooter ची किंमत सांगतानाचा व्हिडीओ अग्रवाल यांनी पोस्ट केला आहे. Ola Electric ने त्यांचा व्हिडीओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. यामध्ये भाविश अग्रवाल Ola Scooter ची कामे सांगत आहेत. कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये, 'स्कूटर रविवारी येत आहे. मात्र, आमचे सीईओ भाविश अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, याची किंमत आजच सांगून टाकूया...'
खरेतर हा व्हिडीओ एक मार्केटिंग गिमिक आहे. भाविश अग्रवाल किंमत सांगणारच असतात तेव्हा एक फनी म्युझिक ऐकू येते आणि कोणतीही किंमत सांगितली जात नाही. उद्याच काय ते पहा असे यामध्ये म्हटले गेले आहे.
Simple One: सो सिंपल! केवळ 1,947 रुपयांत बुक करा 240 किमी रेंजवाली स्कूटर; 15 ऑगस्टला होणार लाँच
Ola Scooter ची लाँचिंग रविवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. कंपनीने 499 रुपयांत याची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने पहिल्या 24 तासांत 1 लाख बुकिंग मिळाल्याची माहिती दिली. परंतू आजवर किती बुकिंग झालीत याची माहिती कदाचित उद्याच उघड केली जाण्याची शक्यता आहे.
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज