Hydrogen Car Nitin Gadkari: भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. भारत सरकार सतत इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. पण, भारतात सामान्यांना बायो इंधनावर चालणाऱ्या गाड्या कधीपासून वापरता येतील, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी माहिती दिली.
भारत लवकरच इंधन निर्यात करेलमंगळवारी आयोजित एका अवॉर्ड्स शोमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढते प्रदूषण आणि याला आळा घालण्यावरही भाष्य केले. गडकरी म्हणाले की, 'भारतात हायड्रोजन कारमध्ये वापरण्यासाठी बायो इंधन तयार केले जात आहे. यासाठी कचऱ्याचा वापर होतोय. आता आपल्याला इंधन आयात करण्यची गरज नाही. भविष्यात भारत बायो इंधन निर्यात करेल.'
1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी गडकरी पुढे म्हणाले की, 'पाण्यावर गाडी चालू शकते, यावर एकेकाळी माझ्या पत्नीचाही माझ्यावर विश्वास नव्हता. पण, आता हे शक्य झाले आहे. आता लवकरच बायो इंधनावर गाड्या चालतील. येत्या दीड ते दोन वर्षांत भारतात लोक हायड्रोजन कार चालवू शकतील. प्रतिकिलो हायड्रोजन 80 रुपयात मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. 1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी धावू शकते,' विशेष म्हणजे, या पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी भारतातील पहिल्या हायड्रोजन कारमधून आले.
भारतात हायड्रोजन कारचे उत्पादनआता हायड्रोजन कारचे भारतात होणार आहे, त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सध्या हायड्रोजन तीन प्रकारे बनवले जात आहे. काळा हायड्रोजन जो कोळशापासून बनवला जातो. तपकिरी हायड्रोजन जो पेट्रोलियम पदार्थातून बनवला जातो. तिसरा प्रकार ग्रीन हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन कचरा, सांडपाणी किंवा पाण्यापासून बनवता येतो. सध्या भारतात इलेक्ट्रीक वाहनांचा खप एवढा वाढला आहे की, अनेक वाहने एक ते दीड वर्षांच्या वेटिंगवर आहेत. लवकरच भारत वाहनांच्या प्रदूषणापासून मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.