शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 6:45 PM

कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या डिटेल्स...

आपण भारतीय बाजारासाठी एका नव्या SUV वर काम करत आहेत, अशी घोषणा कार उत्पादक कंपनी Hyundai Motor India Limited (HMIL) ने नुकतीच केली आहे. तसेच, ही नवीन एसयूव्ही ग्राहकांना स्मार्ट मोबिलिटीचा एक्सपेरिअन्स देईल, असेही कंपनीने म्हटले आहे. ही नवी SUV टाटा पंचला टक्कर देण्याची शक्यता आहे. ही SUV नुकतीच भारतीय रस्त्यांवरही दिसली होती. सध्या Hyundai ने या नव्या SUV संदर्भात अधिक खुलासा केलेला नाही. कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घेऊयात डिटेल्स...

Ai3 कोडनेमचा वापर करतेय कंपनी -Hyundai आपल्या नव्या छोट्या SUV साठी Ai3 कोडनेमचा वापर करत असल्याचे बोलले जात आहे. ह्युंदाई (Hyundai) Ai3 ग्रँड i10 Nios च्या वर पण व्हेन्यूच्या खाली असेल. यामुळे, ही कार Tata Punch, Citroen C3, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite आणि Renault Kiger सारख्या कारना जबरदस्त फाईट देईल. तसेच हिची किंमतही टाटा पंचच्या जवळपास अथवा त्याहूनही कमी असू शकते.

न्यू एसयूव्हीचे इंजिन पॉवरट्रेन -नवी Hyundai Ai3 ला पॉवर देणारे 1.2-लिटर नॉर्मल एस्पिरेटेड इंजिन असेल. जे अनेक ह्युंदाई (Hyundai) मॉडेल्स, जसे ग्रँड i10 Nios, i20 आणि ऑरावर काम करते. हे 82bhp आणि 113nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स अथवा 5-स्पीड एएमटीसह येते.

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे तरुण गर्ग म्हणाले, आम्ही पुन्हा एकदा ग्राहकांना एका नव्या एसयूव्हीसह खुश करण्यासाठी सज्ज आहोत. जी लवकरच येत आहे. भारतातील एक अग्रगण्य स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून, ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम एसयूव्ही ऑफर करणे हे आमचे लक्ष्य आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाAutomobileवाहन