शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

Hyundai Alcazar SUV च्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी वाईट बातमी; कार लाँच लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 5:26 PM

Hyndai Alcazar Suv : कंपनी याच महिन्यात कार लाँच करण्याच्या होती तयारीत. अनेक कारप्रेमींना आहे या SUV ची प्रतीक्षा

ठळक मुद्देकंपनी याच महिन्यात कार लाँच करण्याच्या होती तयारीत. अनेक कारप्रेमींना आहे या SUV ची प्रतीक्षा

Hyundai Motors India ची बहुप्रतीक्षीत  6/7 सीटर Hyundai Alcazar SUV भारतीय बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. याच महिन्यात कंपनी ही कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात होती. परंतु आता या कारच्या लाँचबद्दल नवी माहिती समोर आली आहे.  (Hyundai Alcazar SUV Launch date Postponed Till June 2021 due to Coronavirus Pandemic)

समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे कंपनीनं Hyundai Alcazar SUV चं लाँच टाळण्याचा विचार केला आहे. आता ही कार जून २०२१ मध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, यानंतरही परिस्थिती कायम राहिली तर या कारचं लाँच आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ह्यंदाईकडे दोन एसयुव्ही असल्या तरी त्या पाच सीटरच आहेत. यामुळे टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा एक्सयुव्ही 500 सारख्या एसयुव्हींना टक्कर देण्यासाठी ह्युंदाईला नवी कार बाजारात उतरवण्याची गरज होती. मारुतीकडे देखील दोन सेव्हेन सीटर कार आहेत. यामुळे ह्युंदाईने सेव्हेन सीटर एसयुव्ही भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. (Hyundai Alcazar ) क्रेटाचे काही फीचर्स मिळणारह्युंदाई अल्काझारमध्ये एसयुव्ही क्रेटाची काही फिचर मिळणार आहेत. दोन्हा कारचा प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. फ्लॅटर रूफलाईन, एलईडी डीआरएल प्रोजेक्टेड हेडलँप, नवीन सी कॉलम, सी शेपड् एलईडी टेल लँप आणि नवीन डिझाईनचा बंपर आदी देण्यात येणार आहे. तसेच या कारला 18 इंचाचे व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे. क्रेटाला 17 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. इंजिन क्षमताHyundai Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेलचे इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 138bhp ताकद आणि 250Nm चा टॉर्क प्रदान करेल. तर डिझेल इंजिन 113bhp ताकद आणि 250Nm टॉर्क प्रदान करेल. कंपनी यामध्ये 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनाचा देखील वापर करण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारTataटाटाMG Motersएमजी मोटर्स