शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

जबरदस्त लूक आणि फीचर्ससह लाँच झाली Hyundai Aura Facelift, पाहा किंमत आणि खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:31 IST

Hyundai Motors ने भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लाँच केली आहे.

2023 Hyundai Aura Facelift Launch Price Features : Hyundai Motors ने भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लाँच केली आहे. याची किंमत 6.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे. 4 एअरबॅग्ज (स्टँडर्ड) आणि 6 एअरबॅग्ज (ऑप्शनल) यांसह 30 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज असलेली ही सेडान कार 6 मोनोटोन कलर ऑप्शनसह येते. नवीन Aura साठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला फर्स्ट-इन-सेगमेंट वायरलेस चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, TICE-C USB फास्ट चार्जरने सुसज्ज असलेल्या 2023 ह्युंदाई ऑरा फेसलिफ्टबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत.

काय आहेत फीचर्स?नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 83 PS पॉवर आणि 113.8 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे 1.2 लिटर बाय फ्युअल (पेट्रोल+सीएनजी) इंजिन 5 स्पीड एमटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 6000 आरपीएमवर 69 पीएस पॉवर आणि 4000 आरपीएमवर 95.2 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, फूटवेल लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, 8-इंच स्क्रीन, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल तसेच पुश स्टार्ट/स्टॉप बटण देण्यात आलेय.

किती आहे किंमत?New Hyundai Aura E 1.2 Petrol MT- 6,29,600 रुपये

New Hyundai Aura S 1.2 Petrol MT- 7,15,000 रुपये

New Hyundai Aura SX 1.2 Petrol MT- 7,92,400 रुपये

New Hyundai Aura SX (O) 1.2 Petrol MT- 8,57,900 रुपये

New Hyundai Aura SX+ 1.2 Petrol AMT- 8,72,600 रुपये

New Hyundai Aura S 1.2 Petrol+CNG MT- 8,10,000 रुपये

New Hyundai Aura SX 1.2 Petrol+CNG MT- 8,87,400 रुपये

या सर्व किंमती एक्स शोरुम आहेत.

टॅग्स :Hyundaiह्युंदाई