देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे. अशातच ह्युंदाईने संधी साधली असून मारुती, फोर्डला मागे टाकले आहे. देशांतर्गत विक्रीमध्ये ह्युंदाई दोन नंबरची कंपनी आहे. तर मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावरच आहे. मात्र, ह्युंदाईने निर्य़ातीमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2019 मध्ये 5.89 टक्क्यांची वाढ नोंदवत भारतीय बनावटीच्या वाहनांची 5.40 लाख निर्यात झाली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार या कळात ह्युंदाईने सर्वाधिक 1.45 लाख प्रवासी वाहने निर्यात केली आहेत.
तर गेल्या वर्षी एकूण निर्यातीचा आकडा 5,10,305 एवढा होता. याकाळात 4.44 टक्के वाढ नोंदविली गेली. तर युटीलीटी व्हेईकलच्या निर्यातीमध्ये 11.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर व्हॅनची निर्यात 17.4 टक्क्यांवरून 2321 वाहनांवर आली आहे. ह्युदाईने एकूण 144982 वाहनांची निर्यात केली. ही निर्यात गेल्या वर्षी पेक्षा 15.17 टक्के जास्त आहे. या कार ऑफ्रिका, पश्चिम आशिया, लॅटीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील 90 देशांमध्ये निर्यात करण्यात आल्या.
फोर्डच्या कार जरीही देशात विकल्या जात नसल्या तरीही त्यांना परदेशातून मोठी मागणी आहे. मात्र, मंदीचा फटका या निर्यातीलाही बसलेला दिसतो. ही निर्यात 12.57 टक्क्यांनी घटून 106084 एवढी झाली. तर भारतीय कंपनी मारुतीच्या निर्यातीमध्येही 1.7 टक्क्यांची घट झाली. मारुतीने यंदा 75,948 कार निर्यात केल्या.