दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai लवकरच मायक्रो एसयुव्ही लाँच करणार आहे. या एसयुव्हीची किंमतही ४ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. कमी खर्चात एसयुव्हीचा फील हवा असलेल्यांना Hyundai Casper हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या एसयुव्हीची सर्व स्पाय फोटो लीक झाले आहेत. ही एसयुव्ही सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. ही ह्युंदाई कॅस्पर मारुतीच्या एस प्रेसोला थेट टक्कर देणार आहे. (Hyundai will lunch Micro SUV in four lakhs Casper)
Hyundai ची नवीन इलेक्ट्रीक कार आली; एका चार्जिंगमध्ये 480 km ची रेंज
मीडिया रिपोर्टसनुसार पहिल्यांदा लीक झालेल्या स्पाय इमेजमध्ये ह्यंदाई कॅस्परचे इंटेरिअर दिसले होते. कॅस्पर एक 4 सीटर एसयुव्ही असेल ज्यामध्ये छोटे कुटुंब आरामात बसू शकते. एसयुव्हीची केबिनमध्ये प्रिमिअम फीचर्स वापरण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना कारमध्ये बसल्यानंतर चांगला अनुभव मिळणार आहे.
Car Tips: फक्त मायलेज पाहून खरेदी करू नका कार-बाईक; हे नुकसानही होते...
इंटेरिअंर फिचरबाबत बोलायचे झाले तर Hyundai Casper मायक्रो एसयुव्हीमध्ये ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरसाठी आर्मरेस्ट, सेंट्रल कन्सोलमध्ये मोठी जागा, बॉटल होल्डर, कार्ड होल्डर आणि एक मोठा ग्लोव बॉक्स मिळण्याची शक्यता आहे. अन्य फीचरमध्ये या छोट्या एसयुव्हीमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबत 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, कनेक्टेड कार टेक, कीलेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट / स्टॉप बटन, रिव्हर्स कॅमेरा आदि मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअर बॅग, ईबीडीसोबत एबीएस. रिअर पार्किंग सेन्सर,स्पीड अलर्ट आणि अन्य फीचर्स स्टँडर्ड स्वरुपाचे असणार आहेत.
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज
इंजिन आणि ताकद कोरियन मॉडेलसारखेच असेल, 1.0 लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड किंवा 1.0 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन असणार आहे. भारतीय बाजारात या मायक्रो एसयुव्हीमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 82bhp आणि 113Nm चा टॉर्क जनरेट होईल. कंपनी 1.1-लीटर इंजिनचाही पर्याय देऊ शकते. हे इंजिन 68bhp आणि 99Nm टॉर्क प्रदेन करेल. एसयुव्हीमध्ये ट्रान्समिशन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात येणार आहे.