शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 1:16 PM

Hyundai Casper Micro Suv : Hyundai Casper च्या डायमेंशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झालास रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही मायक्रो SUV लेटेस्ट K1 प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे.

मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील रिक्त जागा लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) लवकरच आपली नवीन micro SUV लाँच करणार आहे, तिचे नाव ह्युंदाई कॅस्पर (Hyundai Casper) असे आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतात Hyundai Casper SUV लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी Hyundai Casper मायक्रो SUV सेगमेंटमधील सर्वात स्वस्त SUV असू शकते.

Hyundai Casper च्या डायमेंशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झालास रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही मायक्रो SUV लेटेस्ट K1 प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे. SUV ही 3,595 मिमी लांब, 1,595 मिमी रुंद आणि 1,575 मिमी उंच बनवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या SUVच्या पुढील भागात कंपनीने राउंड शेप हेडलॅम्प, नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बंपर, सिंगल स्लॅट फ्रंट ग्रिल, डीआरएल, फ्रंट आणि रियरमध्ये स्किड प्लेट्स, स्पोक आणि अलॉय व्हील्स जोडले आहेत.

Hyundai Casper Engine and TransmissionHyundai Casper च्या इंजिन आणि पॉवरबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी या मायक्रो एसयूव्हीमध्ये पेट्रोल इंजिन देईल, ज्यामध्ये दोन ट्रिम्सचा पर्याय मिळतील. Hyundai Casper चे पहिले इंजिन 1.1 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन आहे आणि दुसरे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड केलेले पेट्रोल इंजिन आहे. या दोन्ही इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन पर्याय आढळू शकतात.

Hyundai Casper FeaturesHyundai Casper SUV मध्ये दिलेल्या फीचपर्सबद्दल सांगायचे झाले तर, कंपनी अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, कॅमेरासह रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.

Hyundai Casper RivalsHyundai Casper च्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, कंपनी 5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च करू शकते. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर, ही Hyundai Casper ची मायक्रो SUV सेंगमेंटमधील लोकप्रिय मारुती एस्प्रेसो, टाटा पंच आणि Citroen C3 सारख्या SUV सोबत स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकार