दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने (Hyundai) आपल्या प्रसिद्ध स्पोर्टी युटिलिटी व्हेइकलचे (SUV) नवीन फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन एसयुव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ते सध्याच्या मॉडेलपेक्षा बरेच वेगळे बनले आहे. कंपनीनं एसयुव्हीचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. ह्युंदाईने ही नवीन क्रेटा फेसलिफ्ट दक्षिण अमेरिकन बाजारात विक्रीसाठी लाँच केली आहे.
लूक, डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत नवीन क्रेटामध्ये अनेक बदल करण्यात आले असले तरी सर्वात मोठा बदल हा कारच्या सिक्युरिटीबाबत करण्यात आला आहे. कारच्या इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग कॅमेरा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. ही यंत्रणा, चालकाला कोणत्याही येणाऱ्या वाहनांसाठी सतर्क ठेवण्याव्यतिरिक्त, सायकलस्वार, पादचारी किंवा इतर वाहने पुढे असताना अशा परिस्थितीत देखील कार्य करते. एवढेच नाही ही सिस्टम चालक नसताना ऑटोनॉमस ब्रेकिंग लागू करतं.
एक्सटीरिअर डिझाईननवी ह्युंदाई क्रेटा २०२२ भारतात सध्या विक्री होत असलेल्या मॉडेलच्या तुलनेत काही बदलांसह येतं. लूक आणि डिझाईनच्या दृष्टीनं या एसयुव्हीमध्ये अनेक बदल या कारच्या फ्रन्टमध्ये करण्यात आले आहेत. या एसयुव्हीमध्ये नवा फ्रन्ट ग्रील देण्यात आला आहे जो सध्या लाँच झालेल्या SUV 7 सीटर Alcazar पासून प्रेरित असल्याचं दिसून येतं.
मिळतात हे फीचर्सनव्या क्रेटामध्ये काही सेफ्टी फीचर्स सामिल करण्यात आलं आहे. यामध्ये ब्लाईंड स्पॉट मॉनिटरींग सिस्टमच्या व्यतिरिक्त अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) फीचर देण्यात आलं आहे. कार लेफ्ट कन्वर्जन्स डिटेक्शनसोबत येते, हे एक असं फीचर आहे जे ड्रायव्हिंगच्या वेळी देखरेख ठेवतं. इतकंच नाही आवश्यक असेल तर हे आपात्कालिन परिस्थितीत ब्रेकही लावतं.
काही अन्य फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झालं यात ड्रायव्बर फेटीह डिटेक्टर, अॅडप्टीव्ह हाय लाईट, अडप्टीव्ह स्पीड कंट्रोलसारखे फीचर्सही मिळतात. या व्यतिरिक्त या कारमध्ये सहा एअरबॅग्स आणि फोर व्हिल डिस्क ब्रेकसोबत येतात. ब्राझीलमध्ये ही एसयुव्ही दोन इंजिन पर्यायांमध्ये येते.