Hyundai Motor India लवकरच आपली नवीन SUV Hyundai Exter लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी सतत या एसयूव्हीचे टीझर रिलीज करत आहे. आता एका नवीन टीझरनुसार, ही SUV आकाराने लहान असली तरी, यात इतर SUV च्या तुलनेत जास्त फीचर्स देण्यात आली आहेत.
सुरक्षेत शानदार...Hyundai Exter च्या नवीन टीझरनुसार, कंपनीने या SUV मध्ये 6 Airbags दिले आहेत. हे फीचर बेस आणि टॉप, सर्व व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या विभागातील ही पहिली कार असेल, ज्यात 6 एअरबॅग्ज मिळतील. याशिवाय हिल असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्येदेखील या एसयूव्हीमध्ये मिळतील. हे सर्व फीचर्स तुम्हाला प्रत्येक व्हेरियंटमध्ये मिळतील.
इंजिन, पॉवर आणि परफॉर्मन्स...Exter मध्ये कंपनीने 1.2-लिटर काप्पा पेट्रोल इंजिन दिले आहे, जे तुम्ही Grand i10 Nios, i20 आणि Venue सारख्या मॉडेल्समध्ये पाहिले आहे. याच्या पॉवर आउटपुटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जाते की, ही 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करेल. ही एसयूव्ही कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्येही दिली जाईल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Hyundai Exter एकूण पाच प्रकारांमध्ये सादर केले जाईल, ज्यात EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect हे टॉप मॉडेल म्हणून असतीत. या गाडीच्या किंमतीबद्दल माहिती समोर आलेली नाही, परंतु ही निश्चितच Hyundai ची सर्वात स्वस्त SUV असेल. ह्युंदाई व्हेन्यू सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त आहे, ज्याची किंमत 7.72 लाखांपासून सुरू होते. Hyundai Exter बाजारात आल्यानंतर प्रामुख्याने टाटा पंच, रेनॉल्ट किगर, निसान मॅग्नाइट या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.