नवी दिल्ली : ह्युंदाईने प्रिमिअम सेदान श्रेणीमध्ये सर्वाधिक खपाची कार व्हेर्नाला नवीन ताकद प्रदान केली आहे. 1.4 आणि 1.6 लीटर डिझेल इंजिनांचे दोन प्रकार लाँच केले आहेत. यामुळे ग्राहक त्यांच्या आवडी आणि गरजेनुसार इंजिनांचा पर्याय निवडू शकणार आहेत.
व्हेर्नाच्या 1.4 लीटर डिझेल इंजिनाच्या बेस व्हेरिअंटची किंमत 9.29 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. तर 1.4 लीटर डिझेल इंजिनाच्या कारची किंमत 9.99 रुपये आहे. 1.4 लीटरचे इंजिन 90 एचपी ताकद निर्माण करते. 1396 सीसीचे हे इंजिन आय20 मध्येही देण्य़ात आलेले आहे.
या शिवाय ह्युंदाईने आपल्या व्हेर्ना कारमध्ये 1.6 लीटरच्या व्हेरिअंटमध्ये दोन नवे व्हेरिअंट देण्यात आले आहेत. हे व्हर्जन SX+ ट्रीममध्ये प्रोजेक्टर हेडलँप आणि LED डेटाइम रनिंग लाईट्स तसेच LED टेल लँप्स, 16 इंच अलॉय व्हील्स, पावर फोल्डिंग विंग मिरर, 7.0 इंचाचे इन्फोटेन्मेंट सिस्टिम, लेदरचे स्टीअरिंग व्हिल आणि गिअर नॉब, वायरलेस चार्जिंग आणि पुश बटनस्टार्ट ही फिचर्स देण्यात आली आहेत.
व्हेर्ना 1.6 डिझेलमध्ये SX(O) ला सर्वात वरच्या व्हेरिअंटमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅडजेस्टेबल रिअर सिट्स हेडरेस्ट, व्हेंन्टीलेटेड लेदर सीट, टेलिस्कोपिक स्टेअरिंग देण्यात आले आहे. तसेच दोन ऐवजी सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
व्हेर्नाच्या 1.6 पेट्रोल ऑटो SX+ व्हेरिअंटची किंमत 11.52 लाख रुपये आणि नव्या 1.6 डिझेल ऑटो SX(O) ची किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार होंडा सिटी, मारुती सियाझ, टोयोटा यारिस, फोक्सवॅगन व्हेंटो आणि स्कोडा रॅपिडला टक्कर देणार आहे.