ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) सोमवारी ग्रँड i10 एनआयओएस कॉर्पोरेट एडिशन लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी असेल. या कारला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे नवे मॉडेल ट्रिम मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, अशा दोन्ही पॉवरट्रेन ऑप्शनसह असले. या कारच्या फाइव्ह-स्पीड मॅन्युअल व्हेरिअंटची किंमत 6.28 लाख रुपये एढी असेल. तर ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनची (एएमटी) किंमत 6.97 लाख रुपये असेल.
ग्रॅन्ड i10 एनआयओएस कॉर्पोरेट एडिशन ब्लॅक कलर इंटीरियर आणि रेड कलर इन्सर्टसह (सीट, एसी व्हेंट्स आणि गियर बूट) येते. या कारमध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन स्पोर्ट, 17.14 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. हे बाह्य मिररवर एलईडी टर्न इंडिकेटरसह इलेक्ट्रिक फोल्डिंग ORVM सह देखील येते.
Hyundai Motor India चे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, ह्युंदाईने भारतातील प्रगतीशील आणि नव्या युगातील तरुण ग्राहकांसाठी Grand i10 एनआयओएस लाँच केली होती. या कारची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, यानंतर आता आम्हाला ग्रँड i10 एनआयओएसवर स्पोर्टी आणि हाय-टेक फोकस्ड कॉर्पोरेट एडिशन सादर करताना आनंद होत आहे.