दक्षिण कोरियाई कंपनी ह्युंदाईने आज भारतीय बाजारात स्वस्त हॅचबॅक कारचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. Grand i10 Nios आज लाँच करण्यात आली. नवीन अपडेटेड फिचर्ससह या कारची किंमत 5,68,500 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
ह्युंदाईने य़ा कारची बुकिंगही सुरु केली आहे. ११ हजार रुपय़े देऊन कार बुक करता येणार आहे. ही बुकिंग वेबसाईट आणि शोरुममधून करता येणार आहे. ह्युंदाईने आता या कारला पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या कारचा पुढचा बंपर काळ्या ग्रिल, ट्राय-एरो शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL's) देण्यात आला आहे.
पोलर व्हाइट, टायटन ग्रे, टायफून सिल्व्हर, टील ब्लू आणि फेयरी रेड या पाच रंगांमध्ये ही कार आहेच पण नवीन स्पार्क ग्रीन कलर देखील देण्यात आला आहे. केबिनमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. नवीन ग्रे अपहोल्स्ट्री सीट्स आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सोबत फूटवेल लाइटिंग देण्यात आली आहे.
Grand i10 Nios मध्ये 1.2 लीटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. ते 83hp ची ताकद आणि 113.8Nm चा टॉर्क तयार करते. ही कार कंपनीने सीएनजीमध्येही उपलब्ध केली आहे. सीएनजी कार 69hp ची ताकद देते. कंपनीने निऑसमधून १ लीटर टर्बो इंजिन हटविले आहे.
पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन 20.7 kmpl, ऑटोमॅटिक व्हेरिएंट 20.1 kmpl आणि CNG व्हेरिएंट 27.3 kmpl पर्यंत मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आले आहे. टॉप मॉडेलमध्ये 6 एअरबॅग, ISOFIX चाइल्ड अँकर, हिल होल्ड असिस्ट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि ESC सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.