देशातील दोन नंबरची कार कंपनी ह्युंदाईने Grand i10 ही छोटी कार नव्या रुपात लाँच केली आहे. GRAND i10 NIOS ला बोल्ड आणि स्टायलिश डिझाईन, प्रिमिअम आणि जास्त मोठी केबिन, आधुनिक बटने आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
ह्युंदईने GRAND i10 ची तिसरी पिढी लाँच केली आहे. या कारमध्ये आताचे तंत्रज्ञान ग्राहकांना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या कारमध्ये 20.25 सेमीची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय 13.46 सेमीचा डिजिटल स्पीडोमीटर आणि क्लस्टरसोबत मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे.
टाटाच्या टियागोला टक्कर देण्यासाठी Arkamysची प्रिमियम साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच अॅटोमॅटीक एअर कंडीशनर, रिअर एसी व्हेंट्स, इको कोटिंग टेक्नॉलॉजी, हाइ इफेक्टिव एयरफ्लो, वायरलेस फोन चार्जर, वॉशर सोबत रिअर वायपर, रिअर डिफॉगर, रिअर पावर आउटलेट, हेडलैंप एस्कॉर्ट फंक्शन सारखे फिचर देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये आधीपेक्षा जास्त प्रिमिअम मटेरिअल आणि जागा देण्यात आली आहे. ड्राइविंग साइड हाइट एडजेस्टमेंट, टिल्ट स्टीयरिंग, इंजन स्टार्ट/स्टॉप बटन, इलेक्ट्रॉनिक ओरव्हीएम, लेदर रॅप्ड स्टिअरिंग असे फिचर देण्यात आले आहेत.
नव्या कारमध्ये 1.2 लीटरचे 1197 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे 83 पीएसची ताकद निर्माण करते. पेट्रोल व्हेरिअंट 20.7 किमीचे मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. तर डिझेल व्हेरिअंटला 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले असून ते 75 पीएस ताकद निर्माण करते. डिझेलला 26.2 किमीचे मायलेज मिळते. दोन्ही इंधन प्रकारात अॅटोमॅटीकचाही पर्याय देण्यात आला आहे.