शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

Hyundai ने चक्क कुत्र्याला दिली सेल्समनची नोकरी; ग्राहकांचा बनला लाडका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 1:51 PM

Hyundai Car Showroom: या कुत्र्याची अनोखी गोष्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

Hyundai Car Showroom: तुमच्यापैकी अनेकजण कार खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये गेले असतील. तुम्ही शोरुममध्ये जाता, तेव्हा तुम्हाला तिथे उपस्थित कर्मचारी तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला विविध गाड्या दाखवतो. पण, एका आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai ने चक्क एका कुत्र्याला सेल्समन म्हणून कामावर ठेवले आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हे खरंय.

टस्कन प्राइम नावाचा कुत्रा सध्या ह्युंदाईच्या शोरुममध्ये सेल्समन झाला आहे. या मागची कहाणी अतिशय रंजक आहे. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा अनेकांच्या हृदयाला भिडली. या शोरुममध्ये येणारे कर्मचारीदेखील त्या कुत्र्याचे खुप लाड करतात, त्याला खायला घालतात.

कुत्र्याला घेतले दत्तकटक्सन रस्त्यावरचा कुत्रा(स्ट्रीट डॉग) आहे, ज्याला ह्युंदाई शोरुमने दत्तक घेतले आहे. पूर्वी हा कुत्रा शोरुमभोवती चकरा मारायचा. शोरुमचेचे कर्मचारी त्याला खायला घालू लागले आणि त्याच्याशी खेळू लागले. हळुहळू टक्सनने कर्मचाऱ्यांची मने जिंकली आणि त्यांचे नाते घट्ट झाले आहे. यामुळे ह्युंदाईने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

ह्युंदाई आयडी कार्डटस्कन आता ह्युंदाई परिवारातील सदस्य झाला आहे. त्याला सामान्य Hyundai शोरुम कर्मचाऱ्यासारखी वागणूक दिली जाते. विशेष म्हणजे, त्याच्याकडे Tucson Prime नावाचे ओळखपत्रदेखील आहे. हा कुत्रा शोरुमचे रक्षण तर करतोच पण सेल्समन म्हणूनही आपले कर्तव्य बजावतो.

या शोरुममध्ये टस्कन तैनात टक्सनची गोष्ट सोशल मीडियावर बरीच ट्रेंड झाली. आता हे शोरुम कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या शोरुममधून कार घ्यायची असेल तर ब्राझीलला जावे लागेल. हे शोरूम भारतात नसून ब्राझीलच्या एस्पिरिटो सँटो राज्यातील सेरा येथे आहे. दरम्यान, यापूर्वी ब्राझीलच्याच एका कंपनीने एका मांजरीला कर्मचारी बनवले होते.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईdogकुत्राAutomobileवाहनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया