ह्युंदाईने अखेर भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकले आहे. ह्युंदाईने बहुप्रतिक्षित फुल इलेक्ट्रीक कार Hyundai IONIQ 5 SUV वरून पडदा हटविला आहे. या कारची बुकिंगही आजपासून सुरु झाली आहे.
ह्युंदाईने इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर लाँच केलेली ही पहिली बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल आहे. या कारची खरेदी करायची असेल तर ह्युंदाईच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आहे. प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. Ioniq 5 पुढील वर्षीच्या दिल्ली ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये लाँच केली जाणार आहे. हा एक्स्पो ११ जानेवारी २०२३ ला आहे. या एसयुव्हीने २०२२ मध्ये वर्ल्ड कार ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळविला होता. ह्युंदाईचा आयोनिक ५ चा लूक खतरनाक आहे. फ्युचिरिस्टिक एक्स्टीरिअर प्रोफाईल देण्यात आले असून यामध्ये चौकोणी डीआरएल, एलईडी हेडलँप, २० इंचाचे एअरोडायनॅमिक डिझाईनचे अलॉय व्हील्स, फ्लश फिटिंग दरवाजाचे हँडल, इंटीग्रेटेड स्पॉयलर आदी देण्यात आले आहेत. कारमधील डॅशबोर्डवर एक मोठा कंसोल, इंस््ट्रुमेंट कंसोल आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिमसाठी एक-एक स्क्रीन देण्यात आली आहे. दुसऱ्या रोमध्ये एडजस्टेबल सीट आणि स्लायडिंग सेंटर कंसोल देण्य़ात आले आहेत. या कारमध्ये 21 Hyundai SmartSense ADAS दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय-स्पेक मॉडेलला RWD किंवा AWD दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये 58kWh आणि 72.6kWh बॅटरी पॅक मिळतात. Hyundai Ioniq 5 ची अंदाजे किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. Ioniq 5 इलेक्ट्रिक कार EV6 तसेच Volvo XC40 सह इतर अनेक ईव्हीशी स्पर्धा करेल.