नवी दिल्ली : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ह्युंदाई मोटार (Hyundai Motor) कंपनी भारतात लवकरच एक स्वस्त इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे. Hyundai या वर्षी म्हणजे 2022 मध्येच देशात प्रीमियम मॉडेल आणण्यावर भर देत आहे. चार्जिंग इकोसिस्टम, मॅन्युफॅक्चरिंग आणि असेंब्ली यासारख्या मुद्द्यांवर अनेक डिपार्टमेंट काम करत आहेत, असे Hyundai India च्या वतीने सेल्स, मार्केटिंग आणि सर्व्हिस डायरेक्टर तरुण गर्ग यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक कारची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कमी ठेवण्यासाठी कंपनी लोकल पद्धतीने सोर्सिंग आणि उत्पादनाचा वापर करणार आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी अधिकाधिक लोकल उत्पादने बनवली जातील, तर दुसरीकडे, नवीन कार कधी लाँच केली जाईल हे कंपनीने अद्याप सांगितलेले नाही.
Hyundai कडून भारतात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच करणे, हे कंपनीसाठी मोठे यश असणार आहे. 2028 पर्यंत कंपनी आपले 4 मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या कामासाठी कंपनीने भारतात 4044 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे. त्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देणे.
सध्या भारतातील एकूण कार विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा शेअर 1 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. सरकार 2030 पर्यंत केवळ 30 टक्के हिस्सेदारीचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे. एवढेच नाही तर भारतातील प्रदूषण कमी करण्याचे आणि इंधनाचा वापर कमी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. तरुण गर्ग यांनी सांगितले की, Hyundai यावर्षी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरचे प्रीमियम मॉडेल लाँच करेल आणि हळूहळू किंमत कमी करेल.
'चार्जिंग नेटवर्कची क्षमता वाढवण्याची गरज'तरुण गर्ग यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी विस्तृत चार्जिंग नेटवर्क तसेच कमी बॅटरी खर्चाची आवश्यकता असते. कंपनीने पेट्रोल-डिझेल कारचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्याची सुरुवात कमी किमतीत झाली. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये, कंपनी टॉप-डाउन दृष्टिकोनासाठी सतत प्रयत्न करत आहे.