ह्युंदई कंपनीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. ह्युंदई प्रेमींसाठी आता एक महत्वाची बातमी आहे. कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतात बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या वेबसाईटवरुन कंपनीने या कारची माहिती काढली आहे. याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे असे कोणतेही वक्तव्य अद्याप आलेले नाही. Kona EV हे भारतीय बाजारपेठेतील Hyundai चे पहिले इलेक्ट्रिक मॉडेल देखील आहे. कंपनीने ते २०१९ मध्ये लॉन्च केले होते. तेव्हापासून त्यात कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. कोना ईव्हीची विक्री गेल्या अनेक महिन्यांपासून कमी आहे. कंपनी त्यावर ४ लाख रुपयांची कॅश डिस्काउंटही देत आहे. त्यानंतरही ग्राहक मिळत नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यात एकही युनिट विकले गेले नाही. ही कार २३.८४ लाख आणि २४.०३ लाख रुपयांच्या दोन प्रकारांमध्ये येते.
₹६ च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अंतराळ विभागाकडून मोठी ऑर्डर, सतत लागतंय अप्पर सर्किट
कोना इलेक्ट्रिक ४८.४ kWh आणि ६५.४ kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह बाजारात लॉन्च केली जाईल. कंपनीचा दावा आहे की, कार एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ४९० किलोमीटरची WLTP रेंज मिळेल. EV क्रॉसओवर मानक आणि लांब श्रेणी मॉडेलमध्ये सादर केले जाईल. कारमध्ये १२.३-इंच ड्युअल-स्क्रीन डॅशबोर्ड, ADAS, LED लाइटिंग आणि इलेक्ट्रॉनिक गियर निवडक यांसारखी फिचर असतील.
Kona EV मध्ये ADAS, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन ॲव्हॉइडन्स असिस्ट, हाय बीम असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट आणि फॉरवर्ड कोलिजन अव्हायडन्स असिस्ट सिस्टम आहे. यात बोसची ८ स्पीकर साउंड सिस्टम, की लेस एंट्री, ओटीए अपडेट्स, हेड्स-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि पॉवर टेल गेट सारखी फिचर आहेत.