मुंबई: सियोल ऍडव्हान्स टेक्नॅालॅाजीमुळे दिवसेंदिवस कारमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळत असून, ग्राहकांच्याही या सुविधा चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. अशा प्रकारची एक अत्याधुनिक कार लवकरच बाजारात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर जर साइडला मिरर नसलेल्या कार धावताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, कारण दक्षिण कोरियातील ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यापैकी एक असलेल्या Hyundai Mobisने कॅमेरा मॅानिटरिंग कार्यप्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पुढील जनरेशनमध्ये साइड मिररची जागा हे कॅमेरा घेणार असल्याचे समजते.Hyundai Mobis या कंपनीच्या माहितीनुसार, या कॅमेरा मॅानिटरिंग कार्यप्रणालींतर्गत गाडीमध्ये तीन चांगल्या दर्जाचे कॅमेरा सेन्सर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग सेफ्टी वाढणार असून, मायलेज देखील सुधारेल. कारमधले हे साइड मिरर आता कारच्या आतमध्येच असल्यानं साइट मिररची गरज भासणार नाही. साइड मिररचं म्हणजेच कारच्या दोन्ही बाजूंच्या मिररचं काम हे लपलेले कॅमेरे करणार आहेत. Hyundai Mobis या कंपनीच्या ऑटोनोमस डेव्हलपमेंटचे इन्चार्ज अधिकारी ग्रेगरी बॅराटॅाफ यांनी सांगितले की, पुढील काळात कारमध्ये अत्याधुनिक आणि नवनवे बदल करणं गरजेचं आहे. ज्याच्यावर आतापर्यंत जास्त लक्ष्य केंद्रित करण्यात आलेले नाही. तसेच कंपनी फक्त सेन्सर्स आणि त्यावर आधारित असलेल्या टेक्नॉलॅाजीत बदल करणार आहे. यामुळे पुढील येणाऱ्या कारच्या सुरक्षेचा विचार करता कंपनीच्या आणखी मजबूत पार्ट बनवण्याच्या विचाराधीन आहे.
आश्चर्य ! आता 'या' कारला साइड मिरर नसणार, लवकरच येणार बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 1:32 PM