Most Searched Cars On Google: आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी आधी आपण संबंधित कारबद्दल आवर्जुन इंटरनेटवर सर्व माहिती सर्च करतो. तसंच कार खरेदी करण्याआधी विविध पर्याय देखील इंटनेटवर चौकसपणे पडताळून पाहात असतो. पण २०२१ या सालात भारतात गुगल सर्च इंजिनवर सर्वाधिक कोणती कार सर्च केली गेली असं जर तुम्हाला विचारलं तर सर्वसाधारणपणे Maruti किंवा Tata चं कंपनीचं नाव टॉपमध्ये येईल. मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाही.
ऑस्ट्रेलियास्थित 'कंम्पेअर दि मार्केट'नं जगात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या कारची यादी तयार केली आहे. या रिपोर्टमधील दाव्यानुसार भारतात ज्या कारला गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं ती कार मारुती किंवा टाटा कंपनीची नव्हे, तर हुंडाई कंपनीची आहे. Hyundai चं ऑनलाइन क्षेत्रातील अस्तित्व खूप जबरदस्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. कंपनीनं २०२१ या वर्षात Alcazar आणि i20 N line सारखे दमदार कार मॉडल्स देखील लॉन्च केले. बऱ्याच महिन्यांची वाट पाहावी लागत असतानाही Hyundai Creta आणि Hyundai Venue या कार सर्वाधिक सर्च केलेल्या कारमध्ये टॉपवर आहेत.
जगभरात Toyota कंपनीचा बोलबालाजागतिक पातळीवर पाहायचं झाल्यास Toyota कंपनी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी ऑटो कंपनी ठरली आहे. जापान स्थित Toyota कंपनीच्या अनेक जबरदस्त कारचा बाजारात दबदबा आहे. यात Fortuner, Innova कारनं भारतीय बाजारात मजबूत पकड निर्माण केली आहे. तर ऑस्ट्रेलिया, रशिया, जापान आणि दक्षिण अमेरिकेसह आफ्रिकेतही ऑनलाइन सर्चमध्ये Toyota कंपनी आघाडीवर आहे.