देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाला मोठा झटका बसला आहे. नुकत्याच जारी झालेल्या वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिण्यात कंपनी रिटेल सेल्सच्या बाबताती चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
वाहन वितरकांच्या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाने ३८,१५६ युनिट्सची किरकोळ विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४७,५४० युनिट्स एवढा होता. अर्थात आता आता तो २० टक्क्यांनी घसरला आहे.
देशांतर्गत बाजारातील वाटा कमी होऊन 12.58 टक्क्यांवर -देशांतर्गत बाजारातील ह्युंदाईचा वाटा गेल्या महिन्यात कमी होऊन 12.58 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी समाल कालावधीत हा वाटा 14.05 टक्के होता. अशा प्रकारे, आता भारतीय बाजारात ह्युंदाई, मारुती सुझुकी इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सनंतर, चौथ्या स्थानावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्युंदाई दुसऱ्या स्थानावर होती. महत्वाचे म्हणजे, देशभरातील १३७८ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधून एकत्रित केलेल्या आकडेवारीच्या आधारे फाडाने हा विक्री आकडा जाहीर केला आहे.
मारुती पुन्हा पहिल्या क्रमांकावर -आकडेवारीचा विचार करता, फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी इंडिया ११८१४९ युनिट्सच्या किरकोळ विक्रीसह प्रवासी वाहन विभागात पहिल्या क्रमांकावर आली आहे. मारुतीचा बाजारातील वाटाही काहीसा वाढून ३८.९४ टक्के झाला आहे. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा ३९,८८९ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे, तिचा बाजार हिस्सा १३.१५ टक्के एवढा होता. तर तिसऱ्या क्रमांकासह टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात ३८,६९६ वाहनांची विक्री केली आणि त्यांचा बाजारातील हिस्सा १२.७५ टक्के एवढा होता.