शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 3:52 PM

Hyundai New Car : कंपनीची ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. कंपनीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक 50 हजार रुपये भरून ही एसयूव्ही बुक करू शकतात.

नवी दिल्ली : ह्युंदाई मोटार ( Hyundai Motor) भारतात 10 ऑगस्ट रोजी 2022 Tucson facelift एसयूव्ही लाँच करणार आहे. पहिले 4 ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार होते. कंपनीची ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. कंपनीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक 50 हजार रुपये भरून ही एसयूव्ही बुक करू शकतात.

विशेष बाब म्हणजे, Hyundai ची ही पहिली एसयूव्ही आहे, जी भारतात लेव्हल 2 च्या ADAS फीचर्सला सपोर्ट करेल. यामध्ये ऑटोमेटेड सेंसिंग टेक्नॉलॉजी,  कोणत्याही ऑब्जेक्टला डिटेक्ट करण्यासाठी कॅमेरा आणि रडार सेन्सर असतील. कठीण परिस्थितीत ही कार स्वतःच ब्रेक लावू शकते.

नवीन पिढीची Hyundai Tucson नवीन लुकसह अपडेट करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये LED हेडलाइटसह मोठी ग्रिल देण्यात आली आहे. हेडलाइट अशा प्रकारे दिले आहेत की, ते ग्रिलचा भाग असल्याचे दिसते. खाली एलईडी फॉग लँप्स मिळतात. तुम्हाला एसयूव्हीच्या मागील बाजूस अपडेटेड एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत.

इंटीरियर अपडेटइंटीरियरच्या बाबतीत या कारमध्ये 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.1-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आहे. कंपनीने यामध्ये अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री आणि ऑटो डिमिंग ORVM सारखे फीचर्स देखील दिले आहेत. याव्यतिरिक्त, यामध्ये 29 फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्स असतील. नवीन Tucson ची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. डिझेल इंजिन असलेल्या Tucson ची किंमत 30 लाख रुपयांच्या आत असू शकते.

इंजिनकंपनीची ही एसयूव्ही दमदार इंजिनसह आणण्यात आली आहे. यात दोन इंजिन ऑप्शन 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन आहेत. पेट्रोल इंजिन सहा-स्पीड ऑटोमॅटिक आणि डिझेल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पेट्रोल इंजिन 156  पीएसची मॅक्सिमम आउटपुट देते, तर डिझेल इंजिन 186 पीएसची पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग