देशातील दुसऱ्या क्रमांकाची ऑटो कंपनी ह्युंदाईचे स्थान धोक्यात येणार आहे. मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर असून टाटा वेगाने वर येत असल्याने ह्युंदाईच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळे ह्युंदाईने दुसरे स्थान कायम ठेवण्यासाठी २०२२ मध्ये मेगा प्लॅन आखला आहे.
ह्युदाई नवीन वर्षात पाच एसयुव्ही कार लाँच करणार आहे. यामध्ये काही जुन्या एसयुव्हींच्या फेसलिफ्ट तर काही ईलेक्ट्रीक कार देखील आहेत. महत्वाचे म्हणजे ह्युंदाई लोकप्रिय एसयुव्ही क्रेटाची फेसलिफ्ट आणणार आहे. याचसोबत कंपनी दोन इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. या कार काही दिवसांपासून टेस्टिंग करताना दिसत आहेत.
Hyundai Motors पुढील वर्षी त्यांच्या दोन लोकप्रिय SUV चे फेसलिफ्ट मॉडेल आणत आहे, जे मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta फेसलिफ्ट आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Venue फेसलिफ्ट असेल. या दोन्ही SUV दीर्घकाळापासून आपापल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जात आहेत, परंतु अलीकडच्या काही महिन्यांत, अन्य कंपन्यांनी नवीन SUV लाँच करून त्यांना आव्हान दिले आहे. यामुळे कंपनीला आता Creta आणि Venue ला अधिक चांगले लुक आणि वैशिष्ट्ये देणे भाग पडले आहे. या दोन्ही एसयूव्ही पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत भारतीय रस्त्यांवर दिसू शकतात आणि येत्या काळात त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
नव्या एसयुव्ही कोणत्या...Hyundai Motors पुढील काही महिन्यांत आपली प्रीमियम SUV Hyundai Tusso लाँच करणार आहे, जिच्या लूकची आधीच चर्चा होत आहे. ही क्रेटा आणि अल्काझारच्या वरच्या सेगमेंटमधील एसयूव्ही असेल, ज्यामध्ये नवनवीन वैशिष्ट्ये असतील. Hyundai Motors पुढील वर्षी त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Kona चे अपडेटेड मॉडेल 2022 Hyundai Kona देखील सादर करणार आहे, जे अधिक बॅटरी रेंज आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह असेल. यासोबतच Hyundai पुढच्या वर्षी भारतात आणखी एक उत्तम इलेक्ट्रिक SUV Hyundai Ionic 5 लाँच करणार आहे, जी केवळ दिसायलाच उत्तम नाही तर त्यांचा वेग आणि बॅटरी रेंजही मोठी असेल.