ह्युंदाईची प्रमिअम सेदान कार ह्युंदाई व्हेर्नाला ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार आता सर्वच कंपन्या गांभीर्याने करू लागल्याचे हे चित्र आहे, एक सोडून. भारतात टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन आणि स्कोडा सारख्या कंपन्यांच्या कारना फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहे. मारुतीच्या एकाही कारला आजपर्यंत हे रेटिंग मिळालेले नाहीय.
ग्लोबल एनकॅपने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ते आता भारतातील कारच्या क्रॅश टेस्ट करणार नाहीत. कारण भारताने स्वत:ची भारत एनकॅप आणले असून याची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ह्युंदाई भारत एनकॅपमध्ये तीन कार पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. ह्युंदाईची व्हेर्ना ही कार भारताकडून क्रॅश टेस्टसाठी गेलेली शेवटची कार होती.
सर्व आसनांसाठी 6 एअरबॅग्ज, ESC, मागील ISOFIX माउंट आणि सीटबेल्ट रिमाइंडर आदी गोष्टी या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.
भारत NCAP मध्ये चाचणी कशी केली जाईल?भारत NCAP मध्ये क्रॅश टेस्टची सिरीज दिली जाणार आहे. यामध्ये फ्रंट इफेक्ट, साइड पोल इम्पॅक्ट, साइड बॅरियर इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), पादचारी सुरक्षा अनुपालन आणि बरेच काही समाविष्ट असेल. कार्यक्रमाच्या नंतरच्या टप्प्यावर लेन डिपार्चर चेतावणीसह मागील क्रॅश सुरक्षा आणि AEB जोडण्याची योजना आहे.5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त करण्यासाठी, कारला AOP मध्ये किमान 27 गुण आणि COP मध्ये 41 गुण मिळणे आवश्यक आहे. किमान 3-स्टार सुरक्षितता रेटिंगसाठी कार 6 एअरबॅग्ज, ESC, पादचारी सुरक्षा अनुरुप फ्रंट डिझाइन आणि समोरच्या सीटसाठी सीटबेल्ट रिमाइंडरसह सुसज्ज असणे आवश्यक आहे.