शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ह्युंदाईचा मोठा निर्णय! क्रेटा, आय २०सह व्हेर्नाचे ११ व्हेरिअंट केले बंद; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 3:42 PM

दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने आपल्या कारच्या व्हेरिअंटमध्ये मोठे बदल केले आहेत.

दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने आपल्या कारच्या व्हेरिअंटमध्ये मोठे बदल केले आहेत. एप्रिल २०२३ पासून रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्मस लागू होणार आहेत. यामुळे डिझेल कारची विक्री करणे कंपन्यांना महागात पडणार आहे. यामुळे आतापासूनच कंपन्यांनी डिझेल कार बंद करण्यास सुरुवात केली आहे. 

2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय

ह्युंदाईने तीन कार क्रेटा, व्हर्ना आणि आय२० चे काही व्हेरिअंट बंद केले आहेत. कंपनीने एकूण ११ व्हेरिअंट बंद केले आहेत. Hyundai Creta चे 1.4 Turbo GDI DCT S+ आणि 1.5 iMT S बंद होणार आहेत. या कार जानेवारीपासूनच बंद होतील. क्रेटा 1.5-लीटर MPi पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट्ससह तीन इंजिन पर्यायांसह येते.

i20 च्या बंद केलेल्या प्रकारांच्या यादीमध्ये i20 Asta(O) 1.5 CRDi MT, Magna 1.5 CRDi MT आणि Sportz 1.5 CRDi MT यांचा समावेश आहे. हे व्हेरिअंट २३ जानेवारीपासून बंद होतील. i20 Sportz 1.0 Turbo GDi iMT ची मर्यादित युनिट्स उपलब्ध असतील. या कारचा स्टॉक संपताच ते देखील बंद केले जातील. 

Hyundai Verna चे 1.0 Turbo GDI DCT SX(O) प्रकार 23 जानेवारीपासून बंद केला जाईल. तर 1.5 लिटर डिझेलसह MT S+, MT SX आणि 1.5 लिटर पेट्रोलसह MT S+, MT SX फेब्रुवारीपासून बंद केले जाणार आहेत. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाई