मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (Maruti Suzuki India Limited) फ्रोंक्सचे (Fronx) CNG व्हेरिअंट सादर केले आहे. हे दोन्ही व्हेरिअंट सिग्मा आणि डेल्टामध्ये विकले जातील. यांची एक्स-शोरूम किंमत ₹8.41 लाख आणि ₹9.27 लाख एवढी असेल. फ्रोंक्स सीएनजी 28.51 किमी/किलोग्रॅम मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. हिचा सामना नुकत्याच लॉन्च झालेल्या Hyundai Exter CNG सोबत असेल.
मारुती सुझुकीने बलेनो बेस्ड फ्रोंक्स एसयूव्हीचे सीएनजी व्हेरिअंट लॉन्च केले आहे. कंपनीने ही कार सिग्मा आणि डेल्टा व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली आहे. हिच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास कंपनीने हिच्या Sigma व्हेरिअंटची किंमत ₹8.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवली आहे. तसेच, Delta व्हेरिअंटची किंमत ₹9.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी निर्धारित केली आहे.
इंजिन पॉवरट्रेन -फ्रोंक्सच्या इंजिन पॉवरट्रेनसंदर्भात बोलायचे झाल्यास, कारला 1.2-लिटर, चार-सिलेंडर, नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 6,000rpm वर 88.50bhp एवढी मॅक्सिमम पॉवर आउटपुट आणि 4,400rpm वर 113nm एवढा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, सीएनजीवर चालल्यास पॉवर आउटपुट 6,000rpm वर 76bhp मिळते. याच बरोबर टॉर्क आउटपुट 4,300rpm वर 98.5Nm मिळते. सीएनजी पॉवरट्रेन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 15 CNG मॉडेल्स विक्रिसाठी उपलब्ध असून, त्यांनी आतापर्यंत भारतीय बाजारात 1.4 मिलियनहून अधिक S-CNG वाहनांची विक्री केली आहे.