'स्कोडाला सोडले तर काळ सोकावेल, विनाशकारी ठरेल'; मुंबई उच्च न्यायालयात काय सुरु आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:42 IST2025-03-24T17:42:38+5:302025-03-24T17:42:51+5:30
Skoda Tax Case: आधीच मूळ देशात आर्थिक संकटामुळे स्कोडाने मोठमोठ्या फॅक्टरी बंद केल्या आहेत. असे असताना आता एवढा मोठा कर भरावा लागला तर कंपनीवर मोठे संकट ओढवणार आहे.

'स्कोडाला सोडले तर काळ सोकावेल, विनाशकारी ठरेल'; मुंबई उच्च न्यायालयात काय सुरु आहे...
सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगन ग्रुपच्या स्कोडा ब्रँडने भारतात मोठी करचोरी केली आहे. यावरून स्कोडावर कारवाई करण्यात येत असून 1.4 अब्ज डॉलरचा कर चुकविल्याप्रकरणात नोटीस पाठविण्यात आलेली होती. याला स्कोडाने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.
स्कोडाने भारतात पूर्ण वस्तूवर आयात कर जास्त असल्याने स्कोडाने सुटे पार्ट आयात करून ते भारतात जोडले होते. अशाप्रकारे स्कोडाने वेगवेगळ्या ऑर्डर देऊन एकाच कारचे वेगवेगळे सुटे पार्ट आणले होते. अशाप्रकारे स्कोडाने कार पूर्णपणे आयात न करता त्या सुट्या पार्टद्वारे ती कार तयार केली होती. गेली अनेक वर्षे हा खेळ सुरु होता. या प्रकरणी भारतीय कर प्राधिकरणाने स्कोडाला नोटीस पाठविली होती.
आधीच मूळ देशात आर्थिक संकटामुळे स्कोडाने मोठमोठ्या फॅक्टरी बंद केल्या आहेत. असे असताना आता एवढा मोठा कर भरावा लागला तर कंपनीवर मोठे संकट ओढवणार आहे. या खटल्यावर कर प्राधिकरणाने स्कोडाला करमाफी करण्याविरोधात भूमिका मांडली आहे. १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे १२० अब्ज रुपयांची कर नोटीस रद्द केली तर विनाशकारी परिणाम होणार आहेत. यामुळे कंपन्यांना सूचना लपविणे आणि तपासात विलंब करण्यास वाव मिळेल, असे प्राधिकरणाने कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांत म्हटले आहे.
असे झाल्यास याच करचोरी करणाऱ्या कंपन्या नंतर कर अधिकाऱ्यांकडून चौकशीची वेळ मर्यादा निघून गेल्याचा दावा करण्याची शक्यता आहे. १२ वर्षांच्या फोक्सवॅगन शिपमेंटची चौकशी केल्यानंतर सरकारने आयात शुल्काची ही मागणी केली आहे. फोक्सवॅगनने त्यांच्या आयातीबद्दलची महत्त्वाची माहिती आणि डेटा रोखून विलंब केला आहे, असा आरोप कर प्राधिकरणाने केला आहे. कर टाळण्यासाठी काही ऑडी, फोक्सवॅगन आणि स्कोडा कारच्या आयात केलेल्या घटकांचे चुकीचे वर्गीकरण केल्याचा आरोप आहे.