शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

टाटा पंचचा मालक व्हायचे असेल तर, किती असेल ईएमआय; 1 लाख डाऊनपेमेंट केले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 1:07 PM

खरेतर नव्या कार घेणे हे आपापल्या पगारानुसार, खर्चानुसार आणि वापरानुसार ठरवावे लागणार आहे. त्याचीही लिंक खाली दिलेली आहे.

सध्या देशात एका छोट्या परंतू फाईव्ह स्टार रेटिंगवाल्या कारची हवा आहे. ती आहे टाटा पंच. टाटाच्या या कारमध्ये पंच नसला तरी लोक तिच्या मागे लागले आहेत. महिन्याला १०-१२ हजाराच्या संख्येने ही कार खपत आहे. ज्या लोकांना मारुती, ह्युंदाई नकोय त्या लोकांसाठी टाटाची पंच पर्याय ठरत आहे. असे असताना टाटा पंच घेण्यासाठी तुम्हाला किती कर्ज काढावे लागेल? किती हप्ता बसेल आणि किती डाऊनपेमेंट असेल हे पहावे लागणार आहे. 

Car Buying Guide for Salaried : तुमचा पगार किती? त्यानुसार कोणती कार घ्यायची, ते ठरवा... हिशेबाचा जबरदस्त फॉर्म्युलाखरेतर नव्या कार घेणे हे आपापल्या पगारानुसार, खर्चानुसार आणि वापरानुसार ठरवावे लागणार आहे. कारण आता महागाईने तुमच्या खिशातून सेव्हिंगचा पैसाही बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जर हिशेब घातला नाही तर पुढे घात होण्याची शक्यता आहे. सध्या पेट्रोलच्या एन्ट्रीलेव्हल कारही पाच लाखाच्या पुढे येत आहेत. चला तर पाहुयात टाटाच्या पंचचा मालक होण्यासाठी किती पैसे भरावे लागतील...

टाटा पंच खरेदी करायची असेल तर तिची एक्स शोरुम किंमत पहावी लागणार आहे. पंचचे सर्वात स्वस्त मॉडेल Punch Pure आहे. तर सर्वात महागडे मॉडेल हे १० लाखांवर जाते. सर्वात स्वस्त पंचची किंमत सव्वा सहा लाख आहे. यामुळे आपण सर्वात कमी आणि तिसऱ्या सर्वात स्वस्त व्हेरिअंट Tata Punch Adventure ची किंमत पाहणार आहोत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...टाटा पंच Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा चार ट्रिममध्ये ३० व्हेरिअंटमध्ये मिळते. एक्सशोरुम दिल्लीची किंमत ६ लाख ते ९.५४ लाख रुपये आहे. या मायक्रो एसयुव्हीला 1199 cc चे इंजिन आहे जे 20.09 kmpl पर्यंत मायलेज देते. 

चमत्कार! टियागो, अल्ट्रॉझ, नेक्स़ॉन; टाटाच्या गाड्यांचे मायलेज 2.5 किमी प्रति लीटरपर्यंत वाढले

पंच प्युअरची ऑन रोड प्राईज 6,62,599 रुपये आहे. एक लाख रुपये डाउनपेमेंट केले तर 5,62,599 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. ५ वर्षांसाठी ९ टक्क्यांप्रमाणे  11,679 रुपये ईएमआय बसेल. व्याजापोटी 1.40 लाख रुपये लागणार आहेत. 

एडव्हेंचर व्हेरिअंटची ऑन रोड किंमत 7,73,883 रुपये आहे. १ लाखाचे डाऊनपेमेंट केले तर 6,73,883 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. ५ वर्षांसाठी 13,989 ईएमआय बसेल. व्याजापोटी 1.65 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. 

टॅग्स :Tataटाटाcarकार