काही राज्यांमध्ये वाहतुकीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. बऱ्याचदा वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली जाते. पावती फाडल्यामुळे वादही होतात. मात्र, असे केल्याने अधिकचा दंडही भरावा लागू शकतो. तसेच सरकारी कामात अडथळा घातल्याचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. यामुळे वाहतूक पोलिसांशी वाद घालणे टाळले पाहिजे.
नव्या मोटार वाहन कायद्यामुळे गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. दहा पट जास्त दंडाची पावती फाडल्याने वाहनचालक हैरान होत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली जात आहे. असे केल्यास 100 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. बेंगळुरुमध्ये 7 ऑक्टोबरला एकाच दिवशी पोलिसांनी 19 लोकांवर 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की पावती चुकीच्या पद्धतीने आकारली गेली आहे, तर पोलिसांशी हुज्जत घालू नका आणि तेव्हा कोणताही दंड भरू नका. तुम्ही या दंडाविरोधात न्यायालयात जाऊन आव्हान देऊ शकता. नवीन नियम लागू झाल्यापासून वाहतूक पोलिसांविरोधातील प्रकरणे न्यायालयात रोजच निकाली काढली जात आहेत. आधीपेक्षा जास्त वेगाने होत आहेत.
अनेकदा असे होते की घाई गडबडीत तुम्ही गाडीची कागदपत्रे किंवा लायसन घरी विसरायला होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी पकडल्यास ते पावती हाती देतात. अशावेळी दंड न भरता 15 दिवसांच्या आत न्यायालयात जाऊन कागदपत्र दाखवू शकता. चलनापासून तुम्ही तेव्हाच वाचू शकता जेव्हा तुमच्याकडे चलन काढण्याआधीचे कागदपत्र असतील. अनेकदा पीयुसी किंवा इन्शुरन्स काढलेला नसतो. पोलिसांनी पकडल्यानंतर काढल्यास तो ग्राह्य धरला जात नाही.