नवीन कार घ्यायची असो किंवा मग जुनी, कार खरेदी करताना रिसर्च करणं खूप महत्वाचं ठरतं. कारण रिसर्च केल्यानेच तुम्हाला कारची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचीही खात्री पटते. नवीन कार घेण्यापूर्वी पूर्वतयारी महत्त्वाची आहे, तरच कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला तुम्ही एक उत्तम कार घरी आणली आहे असं वाटेल. कार खरेदी करण्यापूर्वी तुमच्या डीलरला विचारले पाहिजेत असे काही प्रश्न जाणून घेऊयात. जेणेकरुन तुम्हाला कार खरेदी केल्यानंतर पश्चाताप होणार नाही.
हे 7 प्रश्न जरूर विचारा१. जर तुम्ही नवीन कार खरेदी करायला गेलात तर सर्वप्रथम डीलरला विचारा की तुम्ही खरेदी करत असलेल्या कारवर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत.२. कारची वॉरंटी किती आहे?३. वॉरंटी कव्हर म्हणजे काय?४. कारच्या भविष्यातील दुरुस्तीच्या योजना काय आहेत?५. कारचे मायलेज किती आहे?६. कारमध्ये कोणते फीचर्स दिले जातात? एक गोष्ट समजून घ्या की जेवढे फीचर्स जास्त तेवढी कारची किंमत जास्त.७. कार खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
तुम्ही नवीन कार खरेदी करण्यासाठी जात असाल तर नेहमी तुमच्याजवळ काही कागदपत्रे ठेवा जसे की आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, बँक स्टेटमेंट इ.
जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल किंवा सेकंड हँड कार खरेदी करणार असाल आणि जर तुम्ही रिसर्च केला नसेल. तसंच तुम्ही डीलरला महत्वाचे प्रश्न विचारले नाहीत तर तुम्हाला कार खरेदी केल्यानंतर प्रश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे वाया जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कधीच घाईघाईने नवीन कार खरेदी करू नये. कार विषयी संपूर्ण माहिती आधी जाणून घ्यावी आणि त्यानंतरच सारासार विचार करुन निर्णय घ्यावा.