जुन्या ड्रायव्हिंग लायसनबाबत केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणी करण्याची कालच मुदत पुन्हा वाढवणार नसल्याचे कळविले आहे. यामुळे हातात केवळ २० दिवस आहेत. अशातच आता लोकांची लायसन शोधण्याची धावपळ उडाली आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी जरी आरटीओमध्ये जावे लागत असले तरी, लायसन हरविले तर नवे मिळविण्यासाठी आता लोकांना आरटीओमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवर काही मिनिटांत तुम्ही नवीन लायसन साठी अर्ज करू शकणार आहात.
तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट लायसनसाठी अर्ज करू शकता. अनेक ठिकाणी योजनांचा लाभ घेण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून लायसनची गरज असते. जर तुमचे जुने ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन हरवले असल्यास तुम्हाला गाडी बाहेर काढणे तोट्याचे ठरू शकते. वाहतूक पोलिसांनी थांबविले तर किंवा अपघात वगैरे झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. आता लायसन नसल्याचा दंड एवढा आहे की, तो भरण्यासाठी खिसाच रिकामा होऊ शकतो.
यामुळे तुम्ही वेळेतच लायसन काढलेले बरे. डुप्लिकेट लायसन मिळविण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे ते मिळवू शकता. तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. ते म्हणजे पोलीस ठाण्यात जाऊन तुम्हाला एफआयआर दाखल करावा लागणार आहे. जर जुने लायसन तुमच्याकडे असेल आणि ते खराब झाले असेल तर ते जमा करावे लागणार आहे. यानंतर डुप्लिकेटसाठी अर्ज करता येईल.
अशी आहे प्रक्रिया....सर्वप्रथम परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा व मागितलेले तपशील येथे भरा. यानंतर, एलएलडी फॉर्म भरा. त्याची प्रिंट काढा. यानंतर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. आता हा फॉर्म आणि सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करा किंवा तो भरून पुन्हा आरटीओच्या वेबसाईटवर अपलोड करा. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे येईल.