शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

दुचाकी वाहनांचा विमा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; होईल फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 1:50 PM

insurance policy for two wheeler : दुचाकीस्वारांसाठी (Two Wheelers Riders) विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही तर अपघाताच्यावेळी देखील आवश्यक आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या काळात दुचाकी हे सर्व वयोगटातील लोकांचे आवडते वाहन बनले आहे. अशा परिस्थितीत वाहनाच्या विम्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. दुचाकीस्वारांसाठी (Two Wheelers Riders) विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही तर अपघाताच्यावेळी देखील आवश्यक आहे.

भारतात बहुतांश वेळ रस्त्यावर वाहने असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत दुचाकी वाहने ही लाखो लोकांची पसंती ठरतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. मात्र, दुचाकीचा विमा असणे गरजेचे आहे. यासोबतच कोणत्या दुचाकी विमा पॉलिसीमध्ये (Bike Insurance Policy) कोणत्या प्रकारचा फायदा मिळत आहे, हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

पॉलिसी कस्टमाइज करू शकतातुम्ही तुमची दुचाकी विमा पॉलिसी कस्टमाइज करू शकता. दुचाकी विमा पॉलिसी अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये वाहनाची इंजिन क्षमता, उत्पादनाचे वर्ष, मॉडेल आणि भौगोलिक स्थान अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही सर्व अॅड-ऑन कव्हरची यादी मिळवू शकता आणि वेगवेगळ्या विमा कंपन्यांची  (Insurance Companies) ऑनलाइन तुलना करू शकता.

कॅशलेस क्लेम करू शकतातुम्ही तुमच्या दुचाकी विमा पॉलिसीसाठी कॅशलेस क्लेम देखील करू शकता. जर तुमची विमा पॉलिसी तुम्हाला तुमच्या दुचाकीसाठी कॅशलेस क्लेम करण्याची परवानगी देत ​​असेल, तर तुम्हाला फक्त वाहन एका गॅरेजमध्ये पाठवायचे आहे, ज्याचे कंपनीशी टाय-अप आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही.

नवीन चावी मिळेल मोफततुमच्या दुचाकीची चावी हरवली असेल तर तुम्ही विमा पॉलिसीसह त्यावर दावा करू शकता. आजच्या धकाधकीच्या जीवनात चावी हरवणे सामान्य गोष्ट आहे. जर तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल, तर तुम्हाला नवीन चावी मिळवण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुमच्या विमा पॉलिसीमध्ये 'की प्रोटेक्ट' अॅड-ऑन पर्याय आहे, जो चोरी किंवा नुकसान झाल्यास हरवलेल्या चाव्यांचा खर्च कव्हर करतो. याशिवाय, कंपनी तुमच्या दुचाकीचे कुलूप आणि चावी बदलण्याची सुविधा देखील देते.

इंजिनचा विमा काढू शकतादुचाकी वाहनात इंजिन हा अत्यंत महत्त्वाचा आणि खर्चिक भाग आहे. हे मूलभूत विमा योजनेत समाविष्ट नाही. मात्र, तुम्ही अर्थातच पॉलिसी कस्टमाइज करू शकता आणि 'बाईक इंजिन प्रोटेक्ट' अॅड-ऑन कव्हर खरेदी करून इंजिनचा विमा काढू शकता.

अपघातावेळी कायदेशीर संरक्षणविमा संरक्षणासोबतच एखाद्याला कायदेशीर संरक्षणही मिळते. विमा पॉलिसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसी तुम्हाला कायदेशीर संरक्षण देते. अपघात झाल्यास आणि तृतीय पक्षांसोबत कायदेशीर समस्या असल्यास, विमा पॉलिसी दुचाकी मालकांच्या बचावासाठी येतात. अशा परिस्थितीत, थर्ड-पार्टी विमा पॉलिसी तुम्हाला कायदेशीर संरक्षण प्रदान करते.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरAutomobileवाहनbusinessव्यवसाय